ऑनलाइन लोकमतअकोला, दि. ७ : गायगाव रोडवर अकोला येथील शेतकरी रमेश राठी यांचे 8 एकर शेत आहे. या शेतात सोयाबीन आणि तूर पिकाची पेरणी केली आहे. यामध्ये प्रचंड गवत झाल्याने त्यांनी गुरुवारी तणनाशक फवारणी केली. या फवारणीसाठी त्यांनी चक्क आरोचे पाणी वापरले. 30 रुपये कॅन प्रमाणे त्यांनी 100 कॅन पाणी विकत घेतले. गायगाव येथे पाणीटंचाई आहे, गावातून 200 लिटर पाणी घेतल्यास ते 1000 रुपयांमध्ये घ्यावे लागते. त्यासाठी बैल गाडीचे भाडे वेगळे द्यावे लागत आहे. एवढे केल्यावरही पाणी वेळेत मिळत नसल्याने या शेतकऱ्यांने चक्क वॉटर पुरीफायर चे पाणी विकत घेऊन तणनाशक फवारणी सुरु केली आहे.
म्हणून त्या शेतकऱ्याने तणनाशक फवारणीसाठी वापरले 'आरओ' चे पाणी
By admin | Published: July 07, 2016 6:20 PM