बारामती: २०१९ ची बारामती विधानसभा हे भाजपचे टार्गेट नाही. २०२४ ची बारामती लोकसभा निवडणुक हे आमचे टार्गेट आहे.त्यासाठी दर आठवड्याला बारामतीमध्ये येणार आहे. अजितदादांनी या मतदार संघात केलेली एकुण विकासकामे पाहता २०१९ ला त्यांंना पराभूत करणे आशावाद ठरेल,अशी कबुली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.बारामती येथील आयोजित दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप येथील लोकसंपर्क वाढविण्यावर भर देणार आहे.त्यासाठी दर आठवड्याला इथे येण्याचे ठरवले आहे. आज देखील बारामती तालुक्यातील प्रश्नांसाठी आढावा बैठक घेण्यात आली आहे. येथील सर्वसामान्यांमध्ये भाजपबाबत विश्वास निर्माण करणार आहोत.बारामतीकडे थोडेसे दुर्लक्ष झाले. बारामतीमध्ये विधानसभा जिंकणार असा दावा आपण कधीच केलेला नाही.यासंदर्भात छापुन आलेले वृत्त चुकीचे असल्याचे पाटील म्हणाले. मी वेगळ्या प्रकारचा राजकारणी असल्याने हे मान्य करतो.पत्रकारांनी आतातरी हे करेक्ट छापावे म्हणजे अजित पवारांना बरे वाटेल,असे सांगायला पाटील विसरले नाहीत .राज्यातील युतीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याबाबत चर्चा झाली. यावेळी दोन्ही पक्षांच्या निम्म्या जागांबाबत चर्चा झाली आहे. यामध्ये घटकपक्ष,मित्रपक्षांच्या जागा वजा केल्यानंतरच्या निम्म्या जागा, वजा करण्यापुर्वीच्या जागा याबाबत दुमत आहे.काळाच्या ओघात याबाबत पर्याय निघेल.निम्म्या जागावाटपासह सत्तेतील समान भागीदारी ठरली आहे.याशिवाय आणखी झालेल्या निर्णयाबाबत त्या तिघांशिवाय कोणीही सांगु शकणार नसल्याचे पाटील म्हणाले.सरकारी अधिकाºयांवर चिखल फेकण्याचा प्रकार चुकीचा आहे. याबाबत नारायण राणे यांनी देखील आपणास फोन केला होता. त्यांनी निलेश राणेंना समजावतो,प्रोजेक्ट वेळेत लावा, असे सांगितले आहे. लोकशाही मागार्ने प्रश्न सुटणे आवश्यक आहे.त्यासाठी लोकशाही मार्गाने जाणेच अपेक्षित आहे. कायदा हातात घेणे योग्य नाहि. प्रश्न चचेर्ने सोडवुया,असे देखील राणे यांना आपण सांगितल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण झाल्यास संपुर्ण राज्यातील कर्मचाऱ्यांचा कॉन्फिडन्स जातो. मारहाणीची घटना राज्यातील कर्मचाऱ्यांचे मनोबल ढासळवणारी आहे.आवश्यक कारवाईचे पोलीस अधिक्षकांना सुचना देण्यात आल्या आहेत,असे पाटील यांनी सांगितले.————————————————
... त्यामुळे अजितदादांना २०१९ च्या निवडणुकीत पराभूत करणे आशावाद ठरेल : चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 2:10 PM
बारामतीमध्ये विधानसभा जिंकणार असा दावा आपण कधीच केलेला नाही.यासंदर्भात छापुन आलेले वृत्त चुकीचे असल्याचे पाटील म्हणाले.
ठळक मुद्दे२०२४ ची बारामती लोकसभा निवडणुक हेच आमचे टार्गेट सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण झाल्यास संपुर्ण राज्यातील कर्मचाऱ्यांचा कॉन्फिडन्स जातो