पुणे : पुण्यातील मानाच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत 2014 साली भारती विद्यापीठाच्या फाईन आर्ट महाविद्यालयाने पुरुषोत्तम करंडक पटकावला. भारती विद्यापीठ पहिल्यांदा या स्पर्धेत सहभागी झाले होते. पहिल्याच वर्षी करंडक पटकावल्याने साहेब खुश झाले होते. त्यांनी त्यांच्या कामातून वेळ काढत सर्व कुटुंबासह एकांकिकेचा प्रयोग पाहण्यास हजेरी लावली. आणि शिक्षकदिनी नाटकातील सर्व कलाकारांना 10 हजार रुपये बक्षिस देत सर्वांचे कौतुक केले. अभिनेता शिवराज वायचळने पतंगरावांची आठवण सांगितली. काँग्रेसचे जेष्ठ नेते पतंगराव कदम यांचे शुक्रवारी रात्री मुंबईत निधन झाले. पतंगराव कदम आपल्या विद्यार्थ्यांवर भरभरून प्रेम करत असत. अभिनेता शिवराज वायचळ याने 2014 साली बसवलेल्या 'उळागड्डी' या एकांकिकेला पुरुषोत्तम करंडक मिळाला तेव्हा पतंगरावांना खूप आनंद झाला होता. त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच आपल्या कामातून वेळ काढत त्यांनी पुरुषोत्तमच्या बक्षीस समारंभाच्या प्रयोगाला सर्व कुटुंबासह हजेरी लावली. नंतर विद्यापीठातील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे कौतुक करत प्रत्येकी 10 हजार रुपये बक्षीस म्हणून दिले होते. ही आठवण सांगताना शिवराज म्हणाला, साहेबांना आम्ही पुरुषोत्तम जिंकल्याचे कळल्यावर ते खूप खुश झाले. त्यांनी आमची भेट घेत आमचे कौतुक केले. महाविद्यालयाने सुद्धा आम्हाला एकांकिकेसाठी खूप मदत केली. विश्वजित कदम यांनी सुद्धा आमचे भरभरून कौतुक केले.
... म्हणून पतंगराव कदम आवर्जून एकांकिकेला उपस्थित राहिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 1:43 PM