ठाणे : शहरात जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे मोठे संकट असतांना आता पालिकेने शहरात त्याची विल्हेवाट लावण्यासाठी विविध स्वरुपाचे छोटेखानी प्रकल्प हाती घेतले आहेत. परंतु, यापुढेही जावून सोसायटीत निर्माण होणाऱ्या कचऱ्याची त्याच ठिकाणी विल्हेवाट लावली जावी यासाठीदेखील प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार, जी गृहसंकुले कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावतील त्यांना मालमत्ताकरात ५ टक्के आणि जी गृहसंकुले इतर सोसायटींचा कचरा विल्हेवाट लावतील त्यांना मालमत्ताकरात ७.५ टक्के कर सवलत दिली जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव शनिवारी होणाऱ्या महासभेत पटलावर ठेवला आहे. ठाणे महापालिका हद्दीत आजघडीला रोज ७५० मेट्रीक टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. सद्यस्थितीत महापालिका घंटागाडीद्वारे घरोघरी जाऊन अथवा ज्या ठिकाणी कोणतही वाहन पोहचू शकत नाही अशा ठिकाणी कचरा संकलकांची नेमणूक करुन घराघरातून कचरा संकलित केला जात आहे. परंतु, वाढत्या नागरिकरणामुळे मोठमोठी गृहसंकूल वाढत असल्याने आणि हॉटेलची संख्याही वाढत आहे. त्यामुळे कचऱ्याची निर्मितीही वाढली आहे. दरम्यान गोळा केला जाणाऱ्या कचऱ्याचे ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण करण्यात येते. सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य असून ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट, गांडूळ खत अथवा बायोमिथेन गॅसची निर्मिती करुन त्याचा वीज निर्मिती किंवा इंधन निर्मितीसाठी उपयोग होऊ शकतो.>शहरातच विल्हेवाट लावण्यासाठी कल्पनाजी गृहसंकुले इतर आस्थापना किमान २५ टक्के व कमाल ५० टक्के पर्यंत कचरा कमी करतील त्यांना मालमत्ताकरातील सामान्य करात ३ टक्के पर्यंत सुट व ५० टक्के पेक्षा जास्त कचरा कमी करतील त्यांना मालमत्ताकरात ५ टक्के सूट देण्याबाबतचा ठराव पारित केला होता. त्यानुसार आता जे गृहसंकुले कचऱ्याचे वर्गीकरण करुन त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावतील त्यांना सामान्य मालमत्ताकरात ५ टक्के व जी गृहसंकुले इतर गृहसंकुलातील कचऱ्याची विल्हेवाट लावतील त्यांना ७.५ टक्के सूट देण्यात येणार आहे. >गृहसंकुलामध्ये गोळा होणारा कचरा हा त्याच ठिकाणी विल्हेवाट लावल्यास कचऱ्याची निर्मिती कमी होऊ शकणार आहे. त्यामुळे पालिकेने आता हे पाऊल उचलले असून कचऱ्याची विल्हेवाट लावणारे गृहसंकुले इतर आस्थापनांसाठी पालिकेने मालमत्ताकरात सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
...तर मालमत्ता करात साडेसात टक्क्यांची सूट
By admin | Published: August 22, 2016 3:51 AM