कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळापासून सुरू असलेले लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्यातला वाद आता कायद्याच्या कक्षेत आणण्यात आला आहे.
महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. स्मार्ट सिटी प्रकरणात अनियमितात व भ्रष्टाचार केल्याच्या संदर्भात जोशी यांची तक्रार असून त्यांनी तुकाराम मुंढे यांच्यासह तीन अधिकाऱ्यांनाही यात समाविष्ट करण्यात आला आहे. तुकाराम मुंढे यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया निशाणा साधला आहे.
तुकाराम मुढेंवर आरोप? काय घाण राजकारण चाललंय नागपुरात असा सवाल अंजली दमानिया यांनी ट्विट करत उपस्थित केला आहे. तसेच लाज वाटली पाहिजे या महापौरांना. अतिशय सरळमार्गी आणि तत्ववादी आहेत असं अंजली दमानिया यांनी सांगितले. तुम्हाला ते नकोसे झाले आहेत म्हणून काटा काढण्याचा प्रयत्न होताना दिसतोय, असा आरोप देखील अंजली दमानिया यांनी केला आहे.
तत्पूर्वी, महापौर यांनी तुकाराम मुढेंविरोधात दाखल करण्यात आलेला तक्रार अर्ज सदर पोलिसांनी पुढील कारवाईसाठी पोलीस आयुक्तांकडे पाठवला असून त्यावर काय कारवाई करायची याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.
२० जून रोजी आयोजित केलेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेतून आयुक्त मुंढे नाराज होऊन बाहेर पडले होते. त्यावर संदीप जोशी यांनी, नाराज होऊ नका, परत या अशा आशयाचे एक पत्रही त्यांना दिले होते. मनपाची ही अर्धवट राहिलेली सभा २३ जून रोजी आयोजित केली असल्याचेही या पत्रात नमूद होते.
महापालिकेत तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्विकारल्यापासून नगरसेवक व पदाधिकारी यांना भेट देत नाही, विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरू असल्यावरून वाद सुरू आहे. त्यात शनिवारी सर्वसाधारण सभेत आयुक्त लोकप्रतिनिधींच्या अधिकारांचे हनन करीत असून हुकूशमशाही कारभार करीत असल्याचा आरोप करीत सत्ताधाऱ्यांनी त्यांना धारेवर धरले. यामुळे आयुक्त महापौरांची परवानगी न घेता सभागृहातून रागारागाने निघून गेल्याची घटना शनिवारी घडली होती.