अहमदनगर : शासनाच्या असामंजस्य धोरणामुळे समाजविघातक प्रवृत्तींना पोषक वातावरण तयार होत आहे़ व्यक्ती स्वातंत्र्य, समता, विकास यांना फाटा देऊन एक चौकटीबद्ध अजेंडा राबविला जात आहे, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.नवीन पिढीपर्यंत फुले, शाहू व आंबेडकरांचे विचार प्रभावीपणे पोहोचावेत, यासाठी नगरला २० डिसेंबरला जातीअंत परिषद होणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़ आंबेडकर म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नव्या पद्धतीने वैदिक परंपरा प्रस्थापित करावयाची आहे़ संघाकडून सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या केवळ पोकळ घोषणा सुरू आहेत़ जातीअंत परिषदेत भारिप बहुजन महासंघासह लाल निशाण, सीपीआय, सीपीएम, सत्यशोधक पार्टी, सत्यशोधक जनआंदोलन हे समविचारी पक्ष व संघटना सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय पक्षांची धोरणे स्पष्ट नसल्याने त्यांना उतरती कळा लागली़ काँग्रेसचे जे झाले, त्याच वाटेवर आज भाजपाही आहे़, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
‘सरकारी धोरणामुळे सामाजिक अस्थिरता’
By admin | Published: December 05, 2015 9:07 AM