शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
3
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
4
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
6
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
7
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
8
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
9
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
10
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
11
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
12
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
13
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
14
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
15
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
16
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
17
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
18
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
19
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
20
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

सोशल मीडियाला ना आई ना बाप - राज ठाकरे

By admin | Published: May 06, 2016 5:25 PM

मला सोशल मीडियावर राहायला व त्या माध्यमातून प्रचारतंत्र राबवायला आवडत नाही, त्याला ना आई ना बाप असं परखड मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

मला सोशल मीडियावर राहायला व त्या माध्यमातून प्रचारतंत्र राबवायला आवडत नाही, त्याला ना आई ना बाप असं परखड मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. मी स्वत: फेसबुक, ट्विटर वा व्हॉट्स अॅपवर नाही असंही ते म्हणाले.
लोकमतच्या संपादकीय टीमसी चर्चा करताना ते म्हणाले की, कुणाही ऐऱ्यागैऱ्याच्या  हातात ते यंत्र असतं, कोणीही उठतो व काहीही बोलत असतो. त्याला किती महत्त्व देणार. काही लोक फेसबुकवर लेख लिहितात व नंतर त्याला किती लाइक मिळाले हे पाहात बसतात. काहीवेळा लाइक्समधून लायकीपण कळते, अशी खिल्लीही त्यांनी उडवली. सोशल मीडियाकडे पाहून काय लिहायचे, कसे व्यक्त व्हायचे हे ठरवू नये. तुम्हाला जे वाटते ते लिहा. प्रतिक्रियांची चिंता करत बसू नका, असे राज म्हणाले.
 
नवसंघीष्ट आले उदयाला
 
सध्या सत्ताधाऱ्यांच्या प्रेमात बुडालेल्यांची एक नवीन टोळी उदयास आली आहे. त्यांना मी ‘नवसंघीष्ट’ असे नाव दिले आहे. ही टोळी सोशल मीडियावर कार्यरत आहे. कोणी मोदी सरकारवर टीका केली की, ही टोळी त्यांच्यावर तुटून पडते. शिवाय, भाजपाचा सोशल मीडिया सेल चांगलाच कार्यरत आहे. आतापर्यंत सोशल मीडियावर केवळ भाजपा कार्यरत होते, पण आता विरोधकांनीही हे तंत्र अवलंबल्याने सोशल मीडियावरील मोदी समर्थकांच्या मक्तेदारीला आव्हान मिळाले आहे. त्यामुळे आता मोदीविरोधी प्रचारही सोशल मीडियावरून सुरू झाला आहे.
 
उठसूठ टिवटिव मला पसंत नाही
 
माझ्यापुरताही मी हाच निर्णय घेतला आहे. मला जेव्हा बोलावेसे वाटेल, तेव्हाच मी बोलणार, उगाच ऊठसूठ टिवटिव करणे मला पसंत नाही. अर्थात, सोशल मीडियावरील प्रचारतंत्र सध्या वापरत नसलो, तरी या तंत्राचा प्रभावी वापर मला २००८ मध्ये अटक झाला, तेव्हा मनसेने तो प्रथम केला होता. भाषणांची क्लिप सर्वत्र मोबाइलवर फिरली. वातावरण निर्मिती झाली. त्या वेळी सगळ्यांना या माध्यमाची ताकद कळली व २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी या माध्यमाचा खुबीने वापर केला.
 
मोदींच्या विजयात सोशल मीडियाचा नाही राहूल गांधींचा वाटा मोठा
 
नरेंद्र मोदी यांच्या २०१४ मधील विजयात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे, हा समज चुकीचा आहे. खरे तर राहुल गांधी यांचा वाटा ५० टक्क्यांपेक्षा जास्त होता. प्रतिस्पर्धी म्हणून मोदींच्या तुलनेत राहुल गांधी कोठेच नव्हते. राहुल यांच्या उमेदवारीमुळे मोदींचे काम सोपे झाले. आता मोदींबाबत मी भूमिका बदलतो असे म्हणतात, पण चांगल्या गोष्टीला चांगले म्हणणे आणि वाईट घडले की वाईट म्हणणे हे स्वाभाविकच ना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत माझी नेमकी हीच भूमिका आहे.