मुंबई: माझ्या शेतामधील आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असे अजब विधान शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केलं. या विधानाचा सोशल मीडियानं चांगलाच समाचार घेतला आहे. रविवारी संभाजी भिडे यांची नाशिक येथे सभा झाली. यावेळी भिडे यांनी म्हटले की, माझ्या शेतातील आंबा खाल्लास अपत्यप्राप्ती होते. आतापर्यंत १८०हून अधिक जोडप्यांना मी हा आंबा दिला. त्यातील दीडशे जणांना अपत्यप्राप्ती झाली असल्याचा दावा भिडे यांनी केला. आपल्या शेतातील आंब्यामुळे अपत्यप्राप्ती होते ही बाब फक्त आईलाच सांगितली होती. आता तुम्हाला सांगत असल्याचे भिडे यांनी सभेत म्हटले. संभाजी भिडे यांच्या या विधानावरुन सध्या सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस पडतो आहे.
भिडेंच्या विधानावरील विनोद :
1. यापुढे बिचाऱ्या कुमारिका आंबा खाताना हजारदा विचार करतील की हा आंबा भिडे गुरुजींच्या झाडावरचा तर नाही ना ?
2. "भाव आंब्याचे आज पार कोसळले ...भिडेंनी त्यांच्या शेतातले रहस्य जेव्हा सांगितले...''
3. आंब्याची नवीन प्रजाती विकसित झालीय म्हणे भुर्जी मँगो
4. ऑफर ऑफर ऑफरमाझ्या शेतातला आंबा खाआणि आय बाप बनात्वरित संपर्क कराभिडे बाबा
5. भिड्यांच्या आंब्याचं नामकरण करण्यात आलंय .... 'बापूस आंबा'
6. भिडेंच्या बागेतील आंबा खाल्ल्याने मुले होतात, हा जागतिक शोध आहे. नोबेलसाठी प्रस्ताव पाठवायला हवा.
7. आंबे खाऊन कोणी बा होत नाही,आणिपगडी बदलून ज्योतिबा होत नाही !
8. शेजारच्या आजोबांनी आज्जीच्या कानाखाली वाजवली. का? तर म्हणे बाजारात जाणाऱ्या आजोबांना आजी 'आंबे घेऊन या' असे म्हणाली.
9. आमच्याकडे संभाजी भिडे यांच्या आमराईतील आंबे मिळतील अशी पाटी पुढील वर्षी दिसली तर आश्चर्य नको..
10. ऑटोमॅटिक सायंटिस्टने शोधले आंब्याचे नवीन वाण.. आंबे खाल्याने होतात मुले..