मुंबई : नेपाळ भूकंपाचे पडसाद फेसबुक, टष्ट्वीटर, व्हॉट्सअप आणि इन्स्टाग्रामवरही यासारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर उमटले. बॉलीवूडचे कलाकार, राजकारण्यांपासून ते थेट सामान्यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. याविषयी माहिती देणारे मेसेजस, दुर्घटनेचे फोटो, बेपत्ता झालेल्या व्यक्तिंबद्दलची माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे.नेपाळ भूकंपामध्ये बेपत्ता झालेल्या व्यक्तिंचे फोटो फेसबुकवर शेअर होत आहे. या शेअरिंगचा ओघ प्रत्येक क्षणी वाढत आहे. काही स्वयंसेवी संस्थांनी सोशल मीडियावर आवाहन करत नेपाळला आर्थिक साहाय्य करण्यासाठी आवाहन केले आहे. तसेच, काही व्यक्तिंनीही भूकंपग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी सामान्यांना आवाहन केले आहे. या आवाहनलाही सामान्यांचा सकारात्मक प्रतिसाद येत असून विविध माध्यमातून नेपाळच्या मदतीसाठी सहाय्य मिळत आहे.व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही जागरुक तरुणांनी ग्रुप तयार करत नेपाळला साहित्य पाठविण्याचा चंग बांधला आहे. (प्रतिनिधी)
नेपाळ भूकंपामुळे सोशल मीडियाही हळहळले
By admin | Published: April 27, 2015 3:58 AM