Anil Deshmukh ED Summons : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १०० कोटी रूपयांच्या खंडणी वसुली प्रकरणाच्या (100 Crores Extortion Case) चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. परंतु शनिवारी अनिल देशमुख यांनी अजून वेळ मागून घेतली. त्यानंतर मंगळवारी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. दरम्यान, त्यांनी ईडीच्या कार्यालयाला पत्र लिहित जबाब हा व्हिडीओ कॉन्फरन्सीगच्या माध्यमातून नोंदवण्याच यावा अशी विनंती केली. यावरून सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अनिल देशमुखांवर निशाणा साधला.
"तुमची प्रतीमा स्वच्छ आहे, तुम्ही काही केलं नाही तर घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. तुम्हाला माहितीये तुम्ही जे केलंय ते चुकीचं केलंय. सध्या माध्यमांमधून जे समोर आलं जी आकडेवारी समोर आली, झोन १ ते झोन ७ नं इतकं कलेक्शन केलं, झोन ८ ते झोन १२ ने इतकं कलेक्शन केलं, ते ऐकून राग येतो. मग कोरोना तुम्हाला आता आठवला, ज्यावेळी तुम्ही भ्रष्टाचार केला तेव्हा कोरोना नाही का आठवला, असं म्हणावंस वाटतं," असं अंजली दमानिया म्हणाल्या."ED नं बिलकुल अपवाद करू नये. कायदा हा सर्वांसाठी समानत आहे. उद्या सगळेच म्हणतील आम्ही घरून उत्तर देऊ. मग काय अर्थ यंत्रणेचा? भाजपची ही चाल आहे, पण तुमचे हाथ देखील बरबटलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही," असं दमानिया म्हणाल्या.