शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

सामाजिक जाणिवेचा नगररचनाकार गमावला

By admin | Published: June 18, 2015 2:44 AM

ज्येष्ठ वास्तुविद्या विशारद चार्ल्स कोरिया यांच्या निधनाने वास्तूरचनेला नवे परिमाण देणारा सामाजिक जाणिवेचा नगररचनाकार आपण गमावला आहे.

मुंबई : ज्येष्ठ वास्तुविद्या विशारद चार्ल्स कोरिया यांच्या निधनाने वास्तूरचनेला नवे परिमाण देणारा सामाजिक जाणिवेचा नगररचनाकार आपण गमावला आहे. एकविसाव्या शतकातील नगरी म्हणून गौरविल्या जाणाऱ्या नवी मुंबईच्या सुनियोजित रचनेमध्ये कोरिया यांचा मुख्य वास्तुविशारद म्हणून मोलाचा सहभाग होता. सिडको आणि तत्कालीन बॉम्बे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (बीएमआरडीए) यामध्ये त्यांचे लक्षणीय योगदान होते. अल्प उत्पन्न गटासाठी परवडणारी घरे आणि आदर्श नगर नियोजनाचा त्यांचा आग्रह सामाजिक बांधिलकी जपणारा होता. त्यांच्या निधनाने एक जाणिवेचा वास्तुविशारद गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरिया यांना श्रद्धांजली वाहिली.स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतातील वास्तुकला विकसित करण्यात मोलाची भूमिका त्यांनी बजावली. केरळमध्ये चार्ल्स कोरिया यांच्या कल्पनेतून साकारलेली लो इन्कम हाऊसिंगची योजना देशभरात गाजली होती. १९७२ साली त्यांना पद्मश्री आणि २००६ साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. १९३० साली सिंकदराबादमध्ये जन्मलेल्या चार्ल्स यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी युनिव्हर्सिटी आॅफ मिशिगन आणि प्रतिष्ठित अशा मेसाचुसेट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी एमआयटीमध्ये शिक्षण घेतले. वास्तुकलेसाठी त्यांना आगा खान पुरस्कार, प्रीमियर इम्पिरियल आॅफ जपान आणि रॉयल इन्स्टिट्यूट आॅफ ब्रिटिश आॅर्किटेक्ट्स : आरआयबीएच्या रॉयल गोल्ड मेडलसमवेत अन्य पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. १९८४ साली त्यांनी मुंबईत नागरी संरचना संशोधन संस्थेची स्थापना केली. ही संस्था पर्यावरण संरक्षण, नागरी समुदायांच्या विकासासाठी काम करते.कोरिया यांचे प्रकल्पमहात्मा गांधी संग्रहालय, साबरमती. मध्य प्रदेश विधानभवन, मध्य प्रदेश. ब्रिटिश कौन्सिल, दिल्ली. जवाहर कला केंद्र, जयपूर. नॅशनल क्राफ्ट्स म्युझियम, नवी दिल्ली. भारत भवन, भोपाळ. सिटी सेंटर, कोलकाता. कला अकादमी, गोवा. एमसी गव्हर्नर इन्स्टिट्यूट फॉर ब्रेन रिसर्च, बोस्टन. इस्माईली सेंटर, टोरांटो. आयुका, पुणे. कांचनजुंगा, पेडर रोड, मुंबई.