शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

सॉफ्टवेअरमध्ये अडकले रक्तविकारग्रस्तांचे प्रमाणपत्र!

By admin | Published: April 28, 2017 1:28 AM

रुग्णांची परवड : दिव्यांग हक्क कायद्याची अद्याप अंमलबजावणी नाही

मुकुंद माळवे - अकोलाकेंद्र शासनाने दिव्यांग हक्क कायदा-२०१६ नुसार हिमोफिलिया, थॅलेसिमिया, सिकलसेल या आजारांचा रुग्णांना लाभ मिळणार आहे; मात्र अद्याप राज्य शासनाने यासंदर्भात सुधारित शासन आदेश निर्गमित न केल्यामुळे, सीएडीएम सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करण्यात आली नसून, यामुळे राज्यातील हजारो रक्तविकारग्रस्त रुग्णांना दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. कें द्र शासनाच्या विधी व न्याय मंत्रालयाने दिव्यांग हक्क कायदा-२०१६ लागू केला असून, या अंतर्गत रक्त विकारग्रस्त हिमोफिलिया, थॅलेसिमिया, सिकलसेल या आजारांच्या रुग्णांसह अ‍ॅसिड हल्ल्यात दिव्यांगत्व आलेल्याचादेखील समावेश आहे; मात्र राज्य शासनाने अद्याप यासंदर्भात शासन आदेशच काढला नसल्यामुळे, केंद्र शासनाच्या कायद्यातील तरतुदींचा लाभ पूर्वी या रक्त विकारामुळे दृष्यरूपात कायमस्वरूपी दिव्यांगत्व आले असेल तरच त्यांना मिळत असे; मात्र २०१३ मध्ये महाराष्ट्रात सीएडीएम (सॉफ्टवेअर फॉर असेसमेंट आॅफ डिसेबिलिटी, महाराष्ट्र) हे दिव्यांगत्वाच्या विश्लेषणासाठी सॉफ्टवेअर आले. त्यानुसार केवळ दृष्टिदोष, कर्ण बधिरता, शारीरिक विकलांगता, गतिमंदता व मानसिक आजार यामुळे ग्रस्त असलेल्या व्याधीग्रस्तांनाच दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र मिळत असून, राज्यातील हजारो रक्तदोषग्रस्त रुग्णांवर त्यांच्या न्याय्य हक्कांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. या संदर्भात पूणे येथील अंपग कल्याण आयुक्त कार्यलयाशी संपर्क साधला असता, नवीन कायद्यानुसार आज्ञावली तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. ‘दिव्यांग कल्याण’च्या मसुद्यात रक्तविकारग्रस्तांचा समावेशच नाही!राज्य सरकारने दिव्यांग व्यक्तींना सुविधा मिळाव्या म्हणून राज्याच्या अपंग कल्याण धोरणाचा मसुदा तयार केला असून, त्यासाठी नागरिकांकडून सूचना मागविल्या आहेत. या मसुद्यात या उपरोक्त रक्त विकारांचा समावेश करावयास हवा होता; मात्र त्यातही रक्तविकारांचा समावेश केला गेला नाही. हिमोफिलियाग्रस्तांची नोंदच नाहीच्राज्य आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर रक्त विकारग्रस्तांचा आकडाच उपलब्ध नसून, अमरावती तथा नागपूर विभागात जवळजवळ ६०० हिमोफिलियाग्रस्तांची नोंद आहे; मात्र बहुसंख्य रुग्णांची पडताळणीच झाली नसून, राज्यातील रुग्णांचा आकडा ११,१२७ एवढा असल्याचे पुणे विद्यापीठाद्वारे केल्या गेलेल्या अध्ययनातून समोर आले आहे. हिमोफिलियाच्या रुग्णांना कायमस्वरूपी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र मिळावे, या मागणीचा हिमोफिलिया सोसायटी तथा हिमोफेलिया फेडरेशनद्वारे पाठपुरावा करण्यात येत आहे; मात्र राज्य शासनाकडून अद्याप सकारात्मक पाऊल उचलले गेले नाही, तसेच हिमोफिलियाग्रस्तांसाठी गरजेच्या असलेल्या फॅक्टर-8 आणि फॅक्टर-9 या रक्तगटासाठी निविदाप्रक्रिया वेळेत होत नसल्यामुळे नागपूरसह अमरावती विभागातील रुग्णांना कठीण स्थितीचा सामना करावा लागत आहे. -अनुराधा सांबरे, सचिव,हिमोफिलिया सोसायटी, नागपूर.