सुशीलकुमार शिंदेंच्या पुनर्वसनावर अवलंबून काँग्रेसची मलमपट्टी !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 03:03 PM2019-07-12T15:03:59+5:302019-07-12T16:19:11+5:30

भाजपने राज्यात विधानसभेच्या २२० जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे. त्यामुळे सहाजिकच भाजपकडून तोडफोडीचे राजकारण करण्यात येण्याची शक्यता आहे.

Solapur Congress depends on the rehabilitation of Sushilkumar Shinde | सुशीलकुमार शिंदेंच्या पुनर्वसनावर अवलंबून काँग्रेसची मलमपट्टी !

सुशीलकुमार शिंदेंच्या पुनर्वसनावर अवलंबून काँग्रेसची मलमपट्टी !

Next

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तसेच आपण कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस अध्यक्षपदावर राहणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे काँग्रेसमध्ये नवीन अध्यक्षचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. त्यात काही दिवसांपूर्वीच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव आले होते. शिंदे यांचे पुनर्वसन होणार या शक्यतेने सोलापूर काँग्रेसमध्ये उत्साह आला होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर काँग्रेसला मोठे धक्के बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदेचे पुनर्वसन सोलापूर काँग्रेसला संजीवनी देणारे ठरू शकते.

भारतीय जनता पक्षाने सोलापूर काबीज करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपने राज्यात विधानसभेच्या २२० जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे. त्यामुळे सहाजिकच भाजपकडून तोडफोडीचे राजकारण करण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या सोलापूरमध्ये काँग्रेसचे तीन आमदार आहेत. त्यातच काँग्रेसच्या बऱ्याच आमदारांनी भाजपशी जवळीक करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

सोलापूरमधील प्रणिती शिंदे सोडल्यास, पंढरपूरचे आमदार भारत भालके आणि अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे हे दोन्ही काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचा चर्चा आहे. तसं झाल्यास सोलापूरमधील काँग्रेसवर मोठे संकट येण्याची शक्यता आहे. मात्र सुशीलकुमार शिंदे यांचे नाव काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आल्यामुळे सोलापूर काँग्रेसमधील उत्साह वाढला आहे. किंबहुना शिंदे अध्यक्षपदी विराजमान झाल्यास, सोलापूरमधील अनेक नेत्यांचे पक्षांतर थांबू शकते, अशी चर्चाही काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे.

प्रणिती शिंदेसमोर 'वंचित'ला रोखण्याचे आव्हान

सोलापूर शहर उत्तर मतदार संघाच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर आपला विधानसभा मतदार संघ राखण्याचे आव्हान आहे. विधानसभेचे बिगूल वाजताच सोलापूर काँग्रेसमधील अनेक नेते पक्षांतर करण्याची शक्यता आहे. त्यातच सोलापूरमध्ये वंचितचे वाढलेले वर्चस्व प्रणिती शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी निर्माण करू शकते. लोकसभा निवडणुकीत त्याचा फटका काँग्रेसला बसलाच आहे. मात्र शिंदे यांचे पुनर्वसन झाल्यास, अनेक संकटाना तोंड देण्यास काँग्रेसला बळ मिळू शकते.

 

Web Title: Solapur Congress depends on the rehabilitation of Sushilkumar Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.