मुंबई : राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल सोलापूर, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांना तर तालुकास्तरावर पुरंदर, कोरेगांव- सातारा, चांदवड आणि गांव पातळीवर मळेगांव, वेळू, कर्जत या गांवाना अनुक्र मे प्रथम, द्वितीय व तृतीय क्र मांकाचे २०१५-१६ चे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहे. उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हे जिल्हे पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत़राज्यस्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार, विभागस्तर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार, तर जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार देण्याची घोषणा झाली होती. जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पुरस्कारांची निवड केली. पत्रकारांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गावे - प्रथम : मळेगांव (ता.बार्शी, जि. सोलापूर) २५ लाख रु ., द्वितीय : वेळू (ता. कोरेगांव, जि. सातारा) १५ लाख रु ., तृतीय : कर्जत (ता. कर्जत, जि. अहमदनगर) ७.५ लाख.तालुके - प्रथम : पुरंदर, जि. पुणे, ३५ लाख रु ., द्वितीय : कोरेगांव, जि. सातारा, २0 लाख रु ., तृतीय : चांदवड, जि. नाशिक, १0 लाख रु .जिल्हे - प्रथम : सोलापूर, ५0 लाख रु ., द्वितीय : पुणे, ३0 लाख रु . तृतीय : अहमदनगर, १५ लाख रु .वैयिक्तक पुरस्कार - प्रथम : संजय शिंदे (रा. निकनूर, ता. जि. बीड, ५0 हजार रु ., द्वितीय : सुभाष नानवटे (रा. दोडकी, ता. जि. वशिम), ३0 हजार रु .सामुदायिक/अशासकीय संस्था पुरस्कार - प्रथम : संस्कृती संवर्धन मंडळ (सगरोळी, ता. बिलोली, जि. नांदेड), १.५0 लाख रु . द्वितीय : आर्ट आॅफ लिव्हिंग सेवाभावी संस्था, जालना, एक लाख रु .मंत्रालयीन अधिकारी/कर्मचारी (स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र)- वि. सि. वखारे, सहसचिव, ना. श्री. कराड, अवर सचिव, शंकर जाधव, अवर सचिव, सुनिल गवळी, सहायक कक्ष अधिकारी. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय जिल्हाधिकारी - पुणे विभाग - सोलापूर जिल्हाधिकारी (प्रथम), पुणे जिल्हाधिकारी (द्वितीय), नाशिक विभाग - अहमदनगर जिल्हाधिकारी (तृतीय) विभागस्तरावरील प्रथम जिल्हाधिकारी - कोकण विभाग - ठाणे जिल्हाधिकारी, नाशिक विभाग - अहमदनगर जिल्हाधिकारी, पुणे विभाग - सोलापूर जिल्हाधिकारी, औरंगाबाद विभाग - उस्मानाबाद जिल्हाधिकारी, अमरावती विभाग - अमरावती जिल्हाधिकारी, नागपूर विभाग - नागपूर जिल्हाधिकारी. (विशेष प्रतिनिधी)
‘जलयुक्त शिवार’मध्ये सोलापूर राज्यात प्रथम
By admin | Published: April 16, 2017 2:58 AM