सोलापूर - Ram Satpute on Congress ( Marathi News ) प्रणिती शिंदेंचं ट्विट म्हणजे पराभूत आणि खचलेली मानसिकता, मी सोलापूर जिल्ह्यातला आमदार, इथल्या जनतेची सेवा करतोय. माझ्या आई वडिलांनी या भागातील अनेक कारखान्यावर ऊसतोडीचं काम केलंय त्यामुळे यांची पराभवाची मानसिकता असल्याने अशी विधाने करतात असं प्रत्युत्तर भाजपा उमेदवार राम सातपुते यांनी काँग्रेसप्रणिती शिंदेंना दिले आहे.
राम सातपुते म्हणाले की, जर पक्षाच्या एकेकाळच्या अध्यक्षा इटलीहून आलेल्या चालल्या, राहुल गांधी वायनाडमध्ये जाऊन निवडणूक लढवलेले चालते. भारतीय जनता पार्टीचा विजय आणि या लोकांचा पराभव होताना दिसतोय. ही खचलेली मानसिकता आहे. येत्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात भाजपाचा विजय होईल. पुन्हा एकदा सोलापूरात भाजपा विजयाची हॅट्रीक करेल असंही त्यांनी सांगितले.
प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्या 'लेटर'वॉर
लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघात काँग्रेसच् याप्रणिती शिंदे यांच्याविरोधात भाजपाचे राम सातपुते अशी लढत होणार आहे. त्यात आज प्रणिती शिंदे यांनी एक पत्र लिहित भाजपाच्या राम सातपुते यांना उपरोधिक टोला लगावला आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे, इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते असं म्हणत प्रणिती शिंदेंनी ही निवडणूक स्थानिक विरुद्ध बाहेरचा असं होणार असल्याचे संकेत दिले.
तर "राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका ऊसतोड कामगाराच्या कुटूंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवलाय, त्याला सोलापूरचा सर्वांगिण विकास करून सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन. "मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, तिथे आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी मा. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास" या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत. आमदार म्हणून सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केलाय असं पत्र सातपुतेंनी प्रणिती शिंदेंना पाठवलं.