सोलापूर : मुंबई येथे सतत होणाºया मुसळधार पावसामुळे व कर्जत-लोणावळा विभागात दरड कोसळल्यामुळे सोलापूर-मुंबई, मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस ही गाडी ८ ते ११ आॅगस्ट या चार दिवसांच्या काळासाठी रद्द करण्यात आली आहे़ याशिवाय लातूर-मुुंबई, बीदर-मुंबई या गाड्याही चार दिवसांसाठी रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
दरम्यान, मुंबई-हैदराबाद हुसेनसागर, राजकोट-सिकंदरबाद या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत़ भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस ही गाडी पुणे स्थानकापर्यंतच धावणार आहे़ कन्याकुमारी-मुंबई एक्स्प्रेस ही गाडी सोलापूर स्थानकापर्यंत धावेल़ याशिवाय हैदराबाद-मुंबई हुसेनसागर एक्स्प्रेस, एलटीटी-मदुराई एक्स्प्रेस, बंगळुरू-मुंबई उद्यान एक्स्प्रेस, कोईमतूर-मुंबई एक्स्प्रेस, सोलापूर-कोल्हापूर, त्रिवेंद्रम-मुंबई, मुंबई-नागरकोईल एक्स्प्रेस या गाड्यांच्या मार्गात अंशिक बदल करण्यात आला आहे.
सतत पडणाºया पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे़ यामुळे सोलापूरहून मुंंबई, पुणे, नाशिक, हैदराबाद, नांदेड, विजयपूर, चेन्नई आदी भागात जाणाºया प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. अचानक झालेल्या या निर्णयामुळे प्रवाशांची मोठी अडचण निर्माण झाली आहे़ महत्त्वाच्या कामानिमित्त प्रवास करणाºया रेल्वे प्रवाशांनी गाड्या रद्द झाल्यामुळे खासगी बस व एसटी महामंडळाच्या गाड्यांचा आधार घेतल्याचे पाहावयास मिळत आहे.
११ आॅगस्टपर्यंत रद्द करण्यात आलेल्या गाड्या...
- - गाडी क्रमांक १२११६ सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस
- - गाडी क्रमांक १२११५ मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस
- - गाडी क्रमांक ५१०३० साईनगर-मुंबई फास्ट पॅसेंजर
- - गाडी क्रमांक १७०३२ हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस
- - गाडी क्रमांक १७२०३ हुबळी-एलटीटी एक्स्प्रेस
- - गाडी क्रमांक २२१०८ लातूर-मुंबई एक्स्प्रेस
- - गाडी क्रमांक २२१४४ बीदर-मुंबई एक्स्प्रेस
१० आॅगस्टपर्यंत रद्द करण्यात आलेल्या गाड्या...
- - गाडी क्रमांक ११०२७ मुंबई-चेन्नई मेल एक्स्प्रेस
- - गाडी क्रमांक ५१०२८ पंढरपूर-मुंबई फास्ट पॅसेंजर
- - गाडी क्रमांक १९३१६ इंदौर-लिंगमपल्ली एक्स्प्रेस
- - गाडी क्रमांक १७२०३ भावनगर-काकीनाडा एक्स्प्रेस
कर्जत-लोणावळा विभागात दरड कोसळल्यामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे़ दरड काढण्याचे काम येत्या चार दिवसात पूर्ण होण्याची आशा आहे़ काम पूर्ण झाल्यास अन् पाऊस कमी झाल्यास रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा सुरळीत होईल़ - प्रदीप हिरडे,वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक