लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे दिले जाणारे ‘राष्ट्रीय सेवा योजने’चे पुरस्कार जाहीर झाले असून सर्वाेत्कृष्ट विद्यापीठाचा सन्मान सोलापूर विद्यापीठाला मिळाला आहे. २०१६-१७ या वर्षासाठी राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये समाजासाठी कार्य करण्याची वृत्ती रुजावी, यासाठी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. सोलापूर विद्यापीठाला सर्वाेत्कृष्ट विद्यापीठ म्हणून स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्वाेत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक म्हणून सोलापूर विद्यापीठाच्या डॉ. बब्रुवान काबंळे यांची घोषणा करण्यात आली आहे. सर्वाेत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार हा सांगलीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान पलूस महाविद्यालय, संगमनेरच्या सं.ना. कला, दा.ज. मालपाणी वाणिज्य आणि ब.ना. सारडा विज्ञान महाविद्यालय, उदगिरीच्या स्वामी विवेकानंद कॉलेज, लेडी अमृताबाई दागा कॉलेज फॉर वूमन यांना जाहीर झाला आहे. कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार हा ८ जणांना जाहीर झाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या रिषी दयाराम अॅण्ड सेठ हसाराम नॅशनल कॉलेजच्या डॉ. विजेंद्र शेखावत यांना जाहीर झाला आहे. सर्वाेत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार हा १६ जणांना जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह आणि २ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेत सोलापूर विद्यापीठ सर्वाेत्कृष्ट
By admin | Published: June 19, 2017 2:30 AM