शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
2
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
3
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
4
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
5
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
6
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
8
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
9
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
10
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
11
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
12
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
13
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
14
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
15
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
16
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
17
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
18
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
19
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
20
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले

महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 09:20 IST

स्वच्छ ऊर्जेच्या प्रवासात केली महत्त्वपूर्ण प्रगती; सोलापूर, धुळे, जालना, बीड आणि सातारा हे जिल्हे ठरले आघाडीवर,  सरकारचे मिळाले पाठबळ

हरीश गुप्ता नवी दिल्ली : महाराष्ट्राने स्वच्छ उर्जेच्या प्रवासात एक महत्त्वपूर्ण यश मिळवले असून सौर ऊर्जा क्षमतेत  ८४५० मेगावॉटचा टप्पा पार केला आहे. राज्याची एकत्रित सौर क्षमता ८,४६६.५० मेगावॅटपर्यंत पोहोचली असून, यात रूफटॉप सौरऊर्जा प्रकल्प (३,०३२.८४ मेगावॅट) आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे प्रकल्प (५० मेगावॅट) यांचा समावेश आहे. 

सरकारचे पाठबळ असलेले मेगा प्रकल्प आणि खासगी क्षेत्रातील उत्साह यांच्यामुळे सौरऊर्जेत वाढ झाली आहे. सोलापूर, धुळे, जालना, बीड आणि सातारा हे जिल्हे प्रादेशिक सौरऊर्जा केंद्र म्हणून पुढे आले आहेत. ८७९ मेगावॅट सौर प्रकल्पांसह सोलापूर आघाडीवर आहे. त्यानंतर धुळे ४९९ मेगावॅट आणि जालना ४८९ मेगावॅटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. इराई फ्लोटिंग सोलर पार्क जलसंवर्धनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे.

देशभरात २४ सौर उद्याने कार्यान्वितअधिकृत सूत्रांनुसार, देशभरात १५,६३३ मेगावॅट क्षमतेची २४ सौर उद्याने कार्यान्वित झाली आहेत. त्यापैकी १२,३९६ मेगावॅट आधीच स्थापित केले गेले आहेत. ४,२७६ मेगावॅट क्षमतेसह राजस्थान आघाडीवर आहे. त्यानंतर ३,९०० मेगावॅट क्षमतेसह आंध्र प्रदेश आणि ३,१०० मेगावॅट क्षमतेसह मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाब, हरयाणा आणि पश्चिम बंगाल यासारख्या प्रमुख राज्यांनी अद्याप या योजनेंतर्गत एकही सौर उद्यान स्थापित केलेले नाही.

४ अल्ट्रा-मेगा सोलर पॉवर पार्कला मंजुरी दोंडाईचा सोलर पार्क (२५० मेगावॅट), पाटोदा सोलर पार्क (२५० मेगावॅट) आणि साई गुरू सोलर पार्क (५०० मेगावॅट) यासह चार मंजूर अल्ट्रा-मेगा सोलर पॉवर पार्क सध्याच्या सौरऊर्जा क्षमतेत १,१०५ मेगावॅटची भर घालणार आहेत. 

टॅग्स :electricityवीज