ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 7 - मागील काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना बुधवारी पहाटेपासून पडत असलेल्या पावसामुळे चांगलाच दिलासा मिळत आहे. बुधवारी पहाटे चार वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सोलापूर शहर परिसरात तसेच जिल्हयातही अनेक ठिकाणी काल रात्रभर मध्यम ते जोरदार पाऊस झाला आहे..
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सकाळी 8.30 वाजेपर्यंत 28.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम सुरुआहे.
1 ते 7 जुन दरम्यान एकुण 97.5 मिमी पाऊस झाला आहे. जुन्या सोलापूरमध्ये पावसाची सरासरी 110 मि.मि. आहे. तुलनेत यंदा आतापर्यंत चांगला पाऊस आहे. दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्या असून काही गावात घरावरील पत्रे उडून गेले आहेत.