शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

'सैराट'च्या परशाबद्दलच्या काही रंजक गोष्टी....

By admin | Published: May 12, 2016 10:25 AM

सध्या 'सैराट' या चित्रपटाने लहानांपासून थोरामोठ्यांपर्यंत सर्वांना वेड लावलं आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - सध्या 'सैराट' या चित्रपटाने लहानांपासून थोरामोठ्यांपर्यंत सर्वांना वेड लावलं आहे. फ्रेश चेहरे, उत्तम अभिनय आणि समधुर संगीत यामुळे या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांतच सर्वांच्या मनावर राज्य करत कोट्यावधींची कमाईही केली आहे. या चित्रपटातील अभिनयासाठी 'आर्ची' म्हणजेच रिंकू राजगुरू हिचे खूप कौतुक झाले आणि तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. तिच्याबद्दल अनेक बातम्यामंधून माहिती मिळालीच आहे, पण चित्रपटाचा देखणा, मोहक हास्य असलेला हिरो परशा अर्थात आकाश ठोसर याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी तुमच्यासाठी....
 
 
> आकाश ठोसर हा मूळचा पुण्याचा. या चित्रपटाचा नायक शोधण्यासाठी दिग्दर्शक नागराज मंजुळे पुण्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये फिरले, अखेर पुण्याचाच असणारा, पण करमाळ्यात तालमीसाठी गेलेल्या आकाशच्या रुपाने त्यांना हा नायक मिळाला. 
 
> २४ फेब्रुवारी १९९३ रोजी जन्मलेल्या आकाश सध्या आता २३ वर्षांचा आहे. तो औंधमधील एसएसव्हीएम शाळेत व त्यानंतर पुणे युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. शिक्षण घेत असतानाच त्याने काही नाटकातही काम केले होते.
 
 
>  आकाश हा एक चांगला कुस्तीपटू असल्याने त्याची शरीरयष्टीही तशीच दणकट होती. मात्र या चित्रपटातील कॉलेजवयीन मुलाची भूमिका करण्यासाठी दिग्दर्शक नागराज मंजुळेने आकाशला वजन कमी करण्यास सांगितले. त्यानुसार त्याने महिन्याभरात १३ किलो वजन कमी केले. 
 
> झिंगाट गाण्यावरील जोशपूर्ण नाचाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. त्याबद्दल आकाश सांगतो, ‘हा खरं तर फुलआॅन गणपती डान्स; पण तो नागराज मंजुळे यांनी जोशपूर्ण करून घेतला आहे.‘‘झिंगाटच्या वेळी शूट करताना माझे मित्र मला ड्रिंक केलंय का, हेदेखील विचारायचे. पण ते गाणंच असं असल्यामुळे आम्ही फुलऑन गणपती डान्स केला.'
 
 
 
> आकाशबद्दल गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आल्यामुळे त्याचे विकिपिडिया पेजही तयार करण्यात आले आहे.
 
> आकाशला नाना पाटेकर आणि अंकुश चौधरी हे दोन्ही अभिनेते खूप आवडतात.