शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
5
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
6
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
7
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
8
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
9
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
10
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
11
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
12
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
13
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

कुछ मिठा हो जाये...

By admin | Published: October 16, 2016 1:37 AM

अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीची तयारी एव्हाना घराघरांत सुरू झाली असेल. साफसफाई, कंदील लावणे, फराळ करणे या सगळ्यात हे दिवस कसे निघून जातील

- भक्ती सोमणअवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीची तयारी एव्हाना घराघरांत सुरू झाली असेल. साफसफाई, कंदील लावणे, फराळ करणे या सगळ्यात हे दिवस कसे निघून जातील ते कळणारही नाही. फराळाची तयारी जरी झाली असली तरी गोड काय करायचं यावर मात्र अनेक गोडसर चर्चा सुरू होतील. कालच कोजागरी पौर्णिमा झाली. त्यासाठी अनेक घरांत मसाला दूध पार्टी झाली असेल. हे दूध पिताना ‘‘अरे, दिवाळी आलीच की! तयारीला लागले पाहिजे,’’ असे उत्साही सूर उमटले असतील. त्यामुळे मसाला दुधाची रंगत आणखी वाढली असेल. दिवाळीत फराळाचे कोणते पदार्थ करायचे यावर झालेल्या चर्चेत साहजिकच चिवडा, चकल्या, शंकरपाळे... अशा नावांची यादी वाढतीच होती. पण सगळ्यात महत्त्वाची चर्चा होती ती गोड काय करायचं याची. या वर्षी दिवाळी पाच दिवस आहे. अनेक घरांमध्ये या दिवसांत रोजच गोड पदार्थ केले जातात. शिवाय बाजारामध्येही गोड पदार्थांची रेलचेल या काळात बघायला मिळते. चमचमीत पदार्थांबरोबरच ही दिवाळी गोड आणि आनंदाची जावी यासाठी म्हणूनच तर सगळे जण तयार असतात. लाडू, करंज्या, अनारसा, गोडे शंकरपाळे, चिरोटे असे खास पारंपरिक पदार्थ घराघरांत केले जातात. पण आता त्यात काहीसा बदल करून म्हणजेच टिष्ट्वस्ट देण्याचीही खाद्यप्रेमी गृहिणींची तयारी असते. उदाहरण द्यायचं झालं तर अनारश्याचं देता येईल. अनारसा हा तसा खूप आवडीने खाल्ला जात नाही. ुफराळाचा नैवेद्य दाखवताना मात्र आवर्जून अनारसा ठेवला जातो. पण पाहुणे आल्यावर अनारसा देताना त्यात थोडा बदल मात्र नक्की करता येईल. अनारश्याचे दोन तुकडे करायचे. एका तुकड्यावर व्हिप्ड क्रीम आणि वर बारीक ड्रायफ्रुट्सचे तुकडे किंवा चेरी ठेवून ते सर्व्ह करायचे. मात्र हे अगदी आयत्यावेळी करावे लागेल. कारण आधी करून ठेवल्यास अनारसा मऊ पडेल. लाडूत तर मनुका, काजू आपण घालतोच. पण त्याच्या मध्ये छोटे चॉकलेट घालून देता येईल. असे विविध प्रकार कल्पकतेने करता येतील. फूड एक्सपर्ट अर्चना आर्ते म्हणाल्या की, असे करंजीच्या बाबतीतही करता येईल. करंजीमध्ये नारळाच्या सारणाऐवजी चॉकलेट, ड्रायफ्रुट्स यांचे सारणही छान लागेल. मात्र करंजी तळताना त्यातले चॉकलेट बाहेर येऊ शकेल त्यासाठी ती बेक केली तर जास्त चविष्ट लागेल. याशिवाय खजूरच्या आत काजू घालून तो खजूर चॉकलेट सॉसमध्ये डिप करायचा आणि त्यावर शुगर बॉल्स टाकायचे. वाटल्यास ते गिफ्ट म्हणूनही देता येतील. जेवढी कल्पकता वाढवाल तेवढे गोड पदार्थ करता येऊ शकतात, असेही अर्चना म्हणाल्या. गुलाबजाम, रबडी, पुरणपोळी या पदार्थांबाबतीतही वेगळे प्रकार करता येऊ शकतात. छोट्या पुरणपोळीवर रबडी देता येऊ शकते. तर गुलाबजाम - रबडी एकत्र करून त्याची फिरनीही मस्त लागेल. अगदी गोडाचा शिराही वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये करता येऊ शकतो. असे अनेक गोड पदार्थ अगदी सहज घरी करता येऊ शकतात. मात्र नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारे थोडेसे टिष्ट्वस्ट देऊन करायचे असतील तर मात्र कल्पकता हवीच. नाहीतर, सध्या दुकानांमध्येही काजू-कतलीपासून ते मालपोव्यापर्यंत पाहिजे ते पदार्थ पाहिजे त्या प्रकारात अगदी सहज उपलब्ध आहेत. मात्र हे गोड पदार्थ करताना लागते ती कल्पकताच. या दिवाळीत अशीच कल्पकता वापरून मस्त मस्त पदार्थ कराल ना!चॉकलेटची बातच न्यारीचॉकलेट तर सगळ्यांनाच आवडतं. चॉकलेटचेही विविध फ्लेवर्स सध्या बाजारात आले आहेत. एकंदरीतच सध्या चॉकलेटला ग्लॅमर प्राप्त झाले आहे. दिवाळीच्या दिवसात आॅफिसेसमधून कॉर्पोरेट गिफ्ट देण्यासाठी चॉकलेट बॉक्स देण्याची पद्धत रूढ झाली आहे. या चॉकलेटमध्ये सध्या अलमंड, टुटीफ्रुटी, फ्रूट अ‍ॅण्ड नट असे प्रकार लोकप्रिय आहेत. याशिवाय कंपनीचे एकत्र चॉकलेटचा सेट असलेले पॅकिंग मिळते. ड्रिंकिंग आणि मिल्क पावडर वापरून किंवा डबल बॉईल करून चॉकलेट घरी करताना त्याला विविध आकार देता येतील. त्याचे पॅकिंंगही सुंदर होते. यात बरेच रंगतदार बदल करत हीच चॉकलेट्स आणखी हटके करण्याचा प्रयत्न आवर्जून करून पाहा.