सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईसोनसाखळी चोरीत सराईत असलेल्या एका गुन्हेगाराने चार महिन्यांत ५७ वेळा जामीन मिळवला आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांचे करायचे काय, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.अफसर सय्यद उर्फ मोहम्मद (२१) हा सराईत सोनसाखळीचोर असून तो आंबिवलीत राहतो. त्याच्यावर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील १४ पोलीस ठाण्यांमध्ये तसेच कल्याण, येरवडा, अलिबाग व नवघर अशा १८ पोलीस ठाण्यांमध्ये सोनसाखळीचोरीचे ५७ गुन्हे दाखल आहेत. यात त्याला चार महिन्यांत ५७ वेळा न्यायालयीन कोठडी मिळाली असता प्रत्येक वेळी जामीन देखील मिळाला आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेचे उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनीही त्यास दुजोरा दिला आहे.मोहम्मद याने प्रत्येक न्यायालयामध्ये खासगी वकील ‘नेमलेले’ आहेत. मोहम्मदवर कारवाई होताच हे वकील त्याला सहज जामीन मिळवून देतात. त्याकरिता कायद्यात असलेल्या पळवाटांचा वापर केला जातो. मोहम्मदसारखा सराईत गुन्हेगारांचे यामुळे फावते. मंगळसूत्र खेचल्यामुळे महिलांना दुखापत होण्याचे प्रकार हल्ली वारंवार घडतात. त्यामुळे महिलां सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सोनसाखळीचोरांच्या मुसक्या आवळण्याकरिता नवी मुंबई पोलिसांनी पाऊल उचलले आहे. त्यानुसार केलेल्या कारवायांमधून मोहम्मद उर्फ अफसर सय्यद (२१) हा पोलिसांच्या हाती लागला आहे. परंतु त्याच्यावर दाखल असलेल्या ५७ गुन्ह्यांमध्ये त्याने अवघ्या चार महिन्यांत ५७ वेळा जामीन मिळवला आहे.
सोनसाखळीचोराला चार महिन्यांत ५७ जामीन
By admin | Published: February 09, 2015 5:37 AM