शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

आजवर ३१९ आमदार झाले निलंबित

By admin | Published: March 23, 2017 2:39 AM

राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील ३१९ सदस्य ४४ प्रकरणांमध्ये आतापर्यंत निलंबित झाले आहेत. त्यापैकी सर्वाधिक

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील ३१९ सदस्य ४४ प्रकरणांमध्ये आतापर्यंत निलंबित झाले आहेत. त्यापैकी सर्वाधिक ४३ सदस्य हे ७ नोव्हेंबर १९६७ रोजी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून निलंबित झाले होते.विदर्भवीर जांबुवंतराव धोटे हे संयुक्त महाराष्ट्रानंतर निलंबित झालेले पहिले आमदार होते. अध्यक्षांच्या दिशेने पेपरवेट फेकल्याने त्यांच्यावर १३ आॅगस्ट १९६४ रोजी ही कारवाई करण्यात आली. नंतर त्यांचे सदस्यत्वच रद्द करण्यात आले. त्या नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले होते. दुष्काळ निवारणासंबंधीच्या मागण्यांवरून गोंधळ घातल्याबद्दल २७ आमदारांना निलंबित केल्याची घटना २३ मार्च १९७३ रोजी घडली होती. आज सभागृहात कापडी फलक फडकविणे ही आम बाब बनली आहे. मात्र, याच कृतीवरून शिवसेनेचे तत्कालिन सदस्य छगन भुजबळ यांच्यावर निलंबनाची कारवाई २६ नोव्हेंबर १९८७ रोजी नागपूर अधिवेशनात करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या आसनाजवळ जाऊन त्यांना शारीरिक इजा करण्याचा प्रयत्न करणे असा आरोप करीत शिवसेनेच्या तीन आमदारांना २४ जुलै १९९१ रोजी निलंबित करण्यात आले होते. त्यातील कालिदास कोळंबकर हे आज काँग्रेसचे आमदार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याच्या शासनाच्या निर्णयावरून संतप्त झालेल्या शिवसेनेच्या १२ सदस्यांनी विधानसभेत साहित्याची नासधूस, मोडतोड केली म्हणून २५ जुलै २००० रोजी निलंबित करण्यात आले आणि याच मुद्यावर आणखी दोन आमदारांवर हीच कारवाई दुसऱ्या दिवशी करण्यात आली होती. आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वात आधी निलंबित झाले ते २७ मार्च २००१ रोजी. तत्कालिन राज्यमंत्री एकनाथ गायकवाड यांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी सभागृहात गोंधळ व गैरवर्तन केल्यामुळे फडणवीस यांच्यासह नऊ आमदारांवर ही कारवाई करण्यात आली होती. शेतकरी आत्महत्या प्रकरणी सभागृहात आक्षेपार्ह फलक फडकविले व प्रेतयात्रा काढल्याबद्दल फडणवीस आणि अन्य नऊ सदस्यांवर ५ डिसेंबर २००६ रोजीदेखील निलंबनाची कारवाई झाली होती. आजचे मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि गिरीश महाजन तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे हे विरोधी पक्षात असताना अध्यक्षांच्या दालनात येऊन उपाध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांना १३ डिसेंबर २००५ रोजी नागपूर अधिवेशनात निलंबित करण्यात आले होते. (विशेष प्रतिनिधी)