कोल्हापूर : राज्यमंत्र्यांच्या अधिकारांबाबत सरकार पातळीवर वाद नाही, याबाबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित समन्वय समितीची बैठक होईल, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास व अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. केसरकर खासगी कार्यक्रमासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या काळात दोन वर्षांनंतर राज्यमंत्र्यांच्या अधिकाराबाबत निर्णय झाला होता. राज्यमंत्र्यांचा अधिकार ठरविण्यासाठी समन्वय समितीसोबत उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार आहे. राज्याचे उत्पन्न वाढवत अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आगामी अर्थसंकल्प सादर करताना सामान्य माणसांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले.
राज्यमंत्र्यांच्या अधिकारांबाबत लवकरच बैठक : केसरकर
By admin | Published: February 15, 2015 10:50 PM