ऑनलाइन लोकमतलातूर, दि. १८- दुष्काळग्रस्त भागात सेल्फी काढणा-या पंकजा मुंडेंवर चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर अखेर स्पष्टीकरण दिलं आहे. हौस म्हणून फोटो काढला नसून, दुष्काळग्रस्त रखरखीत भागात पाणी दिसल्यानं फोटो काढल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे. माझ्या खात्यानं केलेल्या कामाला यश आल्यामुळेच हा सेल्फी काढल्याची पंकजा मुंडेंनी पुस्तीही जोडली. दुष्काळग्रस्त भागातील मांजरा नदीतला गाळ काढण्याचं काम सुरू असताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी त्या भागाला भेट दिली होती. मात्र त्यावेळी पंकजा मुंडेंना सेल्फी काढण्याचा मोह काही आवरता न आल्यानं त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. मांजरा नदीतला गाळ काढत असतानाच सेल्फी काढल्यानं पंकजा मुंडेंवर काल चहूबाजूंनी टीका झाली होती. यावेळी टि्वटरकरांनीही पंकजा मुंडेंना टि्वटच्या माध्यमातून चांगलंच धारेवर धरलं होतं. जलयुक्त शिवार योजनेची पाहणी करताना मंत्री पंकजा मुंडेंनी सेल्फी काढला आणि टि्वटर अकाउंटवर तो फोटो शेअर केला होता. त्यावरून सोशल मीडियासह विरोधकांनी मंत्री मुंडेंवर निशाणा साधत टीका केल्यानंतर पंकजा मुंडेंनी आज स्पष्टीकरण दिलं आहे.
2 selfie with bandhara pic.twitter.com/OKFeyT3OPS— PankajaGopinathMunde (@Pankajamunde) April 16, 2016