ऑनलाइन लोकमतसोेलापूर, दि. १६ : पाच दिवसांपूर्वी सोन्याचे व्यापारी दागिने विक्रीसाठी बार्शी बसथानकावरून कळंबला जाण्यासाठी पंढरपूर - परतूर या बसमध्ये चढत असताना बॅगची चैन कापून त्यातील ४३ लाख ६८ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले होते. स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांनी आरोपीस अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेले पूर्ण दागिने जप्त केले.रविराज रामचंद्र डिकोळे (रा.घोटी.करमाळा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.तर त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संदीप चव्हाण यांनी सांगितली.
सोलापूर जिल्ह्यातील बारलोणी, लऊळ, वडशिंगे, ता.माढा तसेच घोटी, भाळवणी, निंबोरे, सालसे, ता.करमाळा. उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील ब्रह्मगाव आदी गावातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप चव्हाण व सपोनि प्रकाश वाघमारे हे घेत होते.त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक चव्हाण व त्यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार अट्टल गुन्हेगार रविराज डिकोळे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता. त्याने व त्याच्या साथीदाराने १ किलो ४६६ ग्रॅमचे सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी ते दागिने त्याच्याकडून जप्त केले.
यांनी केली कामगिरीपोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप चव्हाण, विशेष पथकाचे सपोनि प्रकाश वाघमारे, पोहेकॉ. नारायण गोलेकर, खाजाभाई मुजावर, पोलीस नाईक सुभाष शेडगे,मोहन मनसावाले, अंकुश मोरे, अमृत खेडकर, मिलिंद कांबळे, अमोल माने, बाळराजे घाडगे, प्रवीण पाटील, नितीन चव्हाण, महादेव लोंढे आदींनी कामगिरी केली.
२५ हजार रुपयांचे बक्षीसएस.टी.स्टॅन्डवरील सराफ बॅग चोरीचा गुन्हा ५ दिवसात उघडकीस आणून मुख्य आरोपीस जेरबंद करुन त्याच्याकडून ४३ लाख ६८ हजार ३१४ रुपयांचे दागिने जप्त केले. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप चव्हाण व सपोनि प्रकाश वाघमारे यांच्या पथकाला २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे सांगितले.