शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

पुण्यात यंदा दहीहंडी, गणेशोत्सव लाउडस्पीकरविना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 5:06 PM

दहीहंडीच्या ऐन तोंडावर  पुण्यात लाउडस्पीकर व्यावसायिकांनी साऊंड सिस्टीम न पुरवण्याचा निर्णय घेतला आहे

पुणे, दि. 11 - दहीहंडीच्या ऐन तोंडावर  पुण्यात लाउडस्पीकर व्यावसायिकांनी साऊंड सिस्टीम न पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने घालून दिलेली डेसिबलची मर्यादा आणि ती उलटल्यास होणा-या कारवाईच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात शहरात लाउडस्पीकर बंद राहणार आहेत. परिणामी दहिहंडी आणि गणेशोत्सवासारखे सण यंदा पुण्यात लाउडस्पीकरविना साजरे होण्याची शक्यता आहे.पुण्यात झालेल्या बैठकीत साऊंड अँड जनरेटर्स असोसिएशनने बंदची हाक दिली. पोलिसांकडून डी.जे.चालकांना होणारी मारहाण, क्षुल्लक कारणावरून साऊंड सिस्टम जप्त करण्याची होणारी कारवाई आणि होणारा छळ या विरोधात हा बेमुदत संप पुकारण्यात आल्याचे साऊंड अँड जनरेटर्स असोसिएशनने स्पष्ट केले. सामान्य वातावरणाचा आवाजही 55 डेसिबल असतो. मग स्पीकर वाजवायचे तरी कसे? असा सवाल करतानाच पोलिसांकडे डेसिबल मोजण्याची यंत्रणाही नाही, असेही असोसिएशनने म्हटले आहे. हा संप राज्यव्यापी असणार असून या संपाला साऊंड व्यावसायिकांची मातृसंस्था असलेल्या 'पाला' या संघटनेनेही पाठिंबा दिला असल्याची माहिती आहे. दहीहंडीसह कोणत्याही सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमात लाउडस्पीकर वाजविण्यात येणार नसल्याचे असोसिएशनने स्पष्ट केल्याने उत्सव मंडळांचे धाबे दणाणले आहेत.

15 ऑगस्टदिवशी लाउडस्पीकर असणार म्युटवर  -

राज्यातील प्रकाश आणि ध्वनी व्यावसायिकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या प्रोफेशनल ऑडियो अँड लायटिंग असोसिएशनने (पाला) 15 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी मूक दिन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. कायद्याचा चुकीचा अर्थ लावल्याने होणाऱ्या समस्यांविरोधात स्वातंत्र्य दिन व दहिहंडी उत्सवादिवशी लाउडस्पीकर व लायटिंग बंद ठेवणार असल्याचे पालाने शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.    

राज्यातील लाउडस्पीकर बंदीमुळे ध्वनी व प्रकाश उद्योगाच्या भविष्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवघ्या ७५ डेसिबलचे बंधन लाउडस्पीकरवर लादण्यात येत आहे. परवाना दिला जात नाही, तसेच परवानगी देतानाही पोलिसांकडून अडवणूक केली जात असल्याचा आरोप पालाचे अध्यक्ष रॉजर ड्रेगो यांनी यांनी सांगितले.                        

पोलीस कोणत्याही कार्यक्रमाआधी घरी येऊन लाउडस्पीकर जप्त करून नेत असल्याचा गंभीर आरोप पालाने केला आहे. मुळात असा कोणताही कायदा किंवा न्यायालयाचे आदेश नाहीत. तरीही पोलिसांकडून मनमानी कारवाई सुरू असल्याचे पालाचे म्हणणे आहे.

नाशिकमध्ये 18 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

ध्वनीक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा 75 डेसीबलपेक्षा अधिक ठेवण्यास बंदीच्या निषेधार्थ मुंबईतील पाला संघटनेच्या आदेशानुसार नाशिकमधील साऊंड व लाईट व्यावसायिकांनीही स्वातंत्र्यदिनादिवशी 'नो साऊंड डे' (म्युट डे) म्हणून पाळणार असल्याचे सांगितले आहे. अमर वझरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. शिवाय, 18 ऑगस्टच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावरही डीजे व्यावसायिक मूक मोर्चा काढणार आहेत.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव