कोल्हापूर : राजारामपुरीतील सन्मित्र हौसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या सौरव सत्यव्रत सबनीस याने ९५.२ टक्के गुणांसह सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशनच्या (सीबीएसई) बारावी परीक्षेत कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक पटकाविला. सौरव येथील कोल्हापूर पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आहे. या परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी आॅनलाईन जाहीर झाला.मार्च-एप्रिलमध्ये परीक्षा झाली होती. त्यात कोल्हापूर पब्लिक स्कूलचा विज्ञान शाखेचा ९९ टक्के आणि वाणिज्य शाखेचा शंभर टक्के निकाल लागला. त्यातील विज्ञान शाखेतील सौरव सबनीसने कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक पटकविला. यजुर्वेदसिंह पवार ९४ टक्क्यांसह स्कूलमध्ये द्वितीय आणि रोहित बर्डे व निपुण गुप्ताने ९३.४ टक्के गुणांसह अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. वाणिज्य शाखेत पौरस कुलकर्णीने (८५ टक्के) प्रथम, जय पेंढारकरने (८४.४) द्वितीय आणि निकिता दांडेकर हिने (८३.४) तृतीय क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांना आर. एल. तावडे फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर तावडे, संस्थापिका शोभा तावडे, मुख्याध्यापिका शुभांगी पवार, योगिनी कुलकर्णी, ज्योती कोडोलीकर, अंजली मेळवंकी यांचे मार्गदर्शन लाभले. शांतीनिकेतन स्कूलचा ९९ टक्के निकाल लागला. स्कूलमधील विज्ञान शाखेतील २६ पैकी २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. चार विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाली असून एक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे. विज्ञानमध्ये निशा बर्गेने (९३.६) प्रथम, आशा सिन्हाने (९०.८) द्वितीय आणि देविका देशपांडेने (८९.६) तृतीय क्रमांक मिळविला. वाणिज्य शाखेतील ३६ पैकी ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून चार विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाली आहे. वाणिज्यमध्ये आशी बन्सलने (९४.२) प्रथम, सानिया पत्कीने (९३.२) द्वितीय आणि अंकिता राठोडने (९२) तृतीय क्रमांक मिळविला. कागल येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला. विज्ञान शाखेत ४0 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सरवडे (ता. राधानगरी) येथील अश्विनी रामचंद्र मोरे हिने ९२.६ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला. प्रीतम भातमारे (९१.२) आणि वैभवी गुरव हिने (९०.६) अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. विद्यालयातील ३७ विद्यार्थी ७५ टक्क्यांहून अधिक तर चार विद्यार्थी ६० टक्क्यांहून अधिक गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना प्राचार्य आर. टी. लाड, उपप्राचार्या अॅन्सी जॉर्ज, जी. आर. चोपडे, एस. एस. गुंजाळ, के. प्रसाद यांचे मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)एमबीबीएस करणारअभ्यासातील सातत्य आणि स्कूलमधील नोटस्वर आधारित अभ्यास केल्यामुळे यश मिळाल्याची प्रतिक्रिया सौरव सबनीसने व्यक्त केली. सौरव म्हणाला, माझे वडील सत्यव्रत, आई उन्नती या पॅथॉलॉजिस्ट आणि बहीण वैभवी डेंटिस्ट आहे. कुटुंब वैद्यकीयक्षेत्राशी संबंधित असल्याने मला पुढे एमबीबीएस करायचे आहे. माझ्या यशात कुटुंबीयांसह शिक्षकांचा वाटा आहे.
सौरव सबनीस विभागात अव्वल
By admin | Published: May 26, 2015 1:04 AM