शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Rain Update: दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 1:13 AM

पावसाचे ढग दाटून आले. ढगांनी काळोख केला होता. पावसाची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र सायं पाच वाजेपर्यंत पावसाचा पत्ता नव्हता.

मुंबई : बंगालच्या उपसागराच्या पश्चिम मध्य भागात निर्माण झालेला अति कमी दाबाचा पट्टा ताशी १७ किलोमीटर वेगाने पुढे सरकत असून, त्याचा परिणाम म्हणून बुधवार आणि गुरुवारी दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडले, असा इशारा हवामान खात्याने दिला.

१४ ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी, तसेच कोकण आणि गोवा, उत्तर कर्नाटकचा आतील भाग आणि मराठवाडा भागात मुसळधार किंवा अति मुसळधार, तर कर्नाटकचा किनारी प्रदेश, तसेच दक्षिण कर्नाटकचा आतला भाग येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत मंगळवारी दिवसा स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता, तर दुपारी रखरखीत ऊन होते. दुपारी तीन वाजल्यानंतर मात्र हवामानात अचानक बदल झाले. पावसाचे ढग दाटून आले. ढगांनी काळोख केला होता. पावसाची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र सायं पाच वाजेपर्यंत पावसाचा पत्ता नव्हता.परतीच्या पावसाचे भाकीत बदललेसक्रीय हवामानाच्या परिस्थितीमुळे मान्सूनच्या परतीचा प्रवास ६ ऑक्टोबरपासून पुढे सरकला नाही. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात अजून पुढील तीन दिवस पावसाचा मुक्काम राहील. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबरच्या आसपास मान्सून राजस्थानतून आपला परतीचा प्रवास सुरू करतो. मात्र यावर्षी तब्बल ११ दिवस विलंबाने म्हणजे २८ सप्टेंबर रोजी मान्सूनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. हवामान खात्याकडील माहितीनुसार, मान्सून ६ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू करणार होता. मात्र सक्रीय हवामानाच्या परिस्थितीमुळे मान्सूनच्या परतीचा प्रवास ६ ऑक्टोबरपासून पुढे सरकला नाही. आजघडीला पर२तीचा मान्सून उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात आहे.मुंबई, ठाण्यातही वाढणार पावसाचा जोरराज्यात मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबई, ठाण्यासह कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. - कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागअशा होत्या मान्सूनच्या परतीच्या तारखा (ऑक्टोबर)जळगाव ६नागपूर ६मुंबई ८अहमदनगर ८सातारा ९कोल्हापूर ११पुणे ११

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान