मुंबई - भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा मागे घेतला असला तरी प्रत्यक्षात मात्र १२ ते १५ जूनदरम्यान दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शिवाय या काळात मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. तर दुसरीकडे पावसाने मुंबईत चांगलीच उघडीप घेतली असून, पावसाच्या विश्रांतीमुळे मुंबई आणि उपनगरातील उकाड्यात वाढ झाल्याने मुंबईकर घामाघूम झाले आहेत. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १२ ते १५ जूनदरम्यान दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १२ आणि १३ जून रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.१२ जून रोजी पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे. १३ जून रोजी पश्चिम विदर्भात पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी दाखल झालेल्या मान्सूनने हजेरी लावली होती. आता पावसाने विश्रांती घेतली असली तरी मंगळवारसह बुधवारी मुंबई शहर व उपनगरात मेघगर्जनेसह पावसाच्या तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे.जेएनपीटीतील रस्ता खचलामधुकर ठाकूरउरण : जेएनपीटीचे चौथ्या बंदरासाठी बांधण्यात आलेले रस्ते पहिल्याच पावसात खचल्यामुळे पुन्हा एकदा हे बंदर चर्चेत आले आहे. कोट्यवधी रु पये खर्च करून जेएनपीटीतील चौथ्या बंदरासाठी रस्ते बांधण्यात आले आहेत. मात्र पहिल्या पावसातच रस्ते खचल्यामुळे कामाबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे हे बंदर सिंगापूर पोर्ट आॅथोरिटीने चालविण्यासाठी घेतले आहे. बंदराचे काम खऱ्या अर्थाने पूर्ण क्षमतेने सुरू झाले नसताना रस्त्यांची ही दुरवस्था पाहून कंपनीचे अधिकारीदेखील नाराज असल्याचे बीएमसीटीएलच्या सूत्रांनी सांगितले.जेएनपीटीचे चौथे बंदर अर्थात बीएमसीटीएल हे काही महिन्यांपूर्वी सुरू झाले. या बंदरासाठी मोठमोठे, ऐसपैस रस्ते बांधण्यात आले. न्हावा-शेवा पोलीस ठाण्यासमोर अशा प्रकारचे अनेक मोठमोठे रस्ते बांधले आहेत तर काही रस्त्यांचे काम सुरू आहे. मात्र पहिल्याच पावसात काही रस्ते खचले असून मोठमोठ्या भेगा गेलेल्या आहेत.याबाबत जेएनपीटीच्या अधिकाºयांकडे विचारणा केली असता, रस्त्यांचे काम निकृष्ट असल्याचे त्यांनी मान्य केले. याबाबत एनएचएआयच्या अधिकाºयांना कळविले असून त्यांनी सोमवारी रस्त्याची पाहणी केली. या रस्त्यांसाठी जेएनपीटी, सिडको आणि केंद्र सरकारने निधी दिला असून कामाचा ठेका देण्याचे काम व त्याच्यावर देखरेख ठेवण्याचे काम एनएचएआयच्या अधिकाºयांचे असल्याचे त्यांनी सांगितले.
दक्षिण कोकणाला मुसळधारचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 6:35 AM