शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

दक्षिणचा ‘नाथ’ कोण?

By admin | Published: June 10, 2014 1:09 AM

दोन दशकापासून बालेकिल्ला असलेल्या दक्षिण नागपुरात काँग्रेसला लोकसभेत तगडा धक्का बसला. दक्षिण नागपुरात हवा नवा ‘नाथ’ अशी काँग्रेस जणांची मागणी आहे. लोकसभेच्या लीडमुळे दक्षिणेत भाजप जोशात आहे.

कॉँग्रेसमध्ये ‘साडे माडे तीन’ : युतीत जागा कोणाला?जितेंद्र ढवळे - नागपूर दोन दशकापासून बालेकिल्ला असलेल्या दक्षिण नागपुरात काँग्रेसला लोकसभेत तगडा धक्का बसला. दक्षिण नागपुरात हवा नवा ‘नाथ’ अशी काँग्रेस  जणांची मागणी आहे. लोकसभेच्या लीडमुळे दक्षिणेत भाजप जोशात आहे. युतीत ही जागा भाजपच्या वाट्याला यावी, यासाठी जोरदार फिल्डिंग  भाजपमधील ‘छोट्या-मोठय़ां’नी लावली आहे. मात्र दक्षिणेत सेनेचा ‘वाघ’च अशी भूमिका शिवसेना कार्यकर्त्यांची आहे.गेल्यावेळी काँग्रेसचे दीनानाथ पडोळे ३५ हजार मतांनी विजयी झाले होते. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शेखर सावरबांधे यांना मागे टाकीत माजी उपमहापौर  किशोर कुमेरिया इथे लढले. मात्र त्यांची कोंडी झाली. त्यांना ३९ हजार ३१६ मतावरच थांबवे लागले. तसा हा मतदारसंघ काँग्रेससाठी मजबूत मानला  जातो. मात्र गडकरींनी काँग्रेसच्या या गडाला सुरुंग लावला. भाजपने तब्बल ६0 हजार २७२ मतांची आघाडी घेतली. त्यामुळे आता हा मतदारसंघ  शिवसेनेच्या कोट्यातून काढून भाजपकडे घेण्याच्या मागणीने आतापासूनच जोर धरला आहे. असे झाले तर शिवसेनेकडून लढण्यास इच्छुकअसलेले  शेखर सावरबांधे यांची निराशा होईल. तशी रिक्स गडकरी घेतील ? काँग्रेससाठी दक्षिणेत ‘साडे माडे तीन’ अशी स्थिती आहे. पडोळे यांच्याऐवजी चिंरजीव विशाल यांना तिकीट मिळावी, यासाठी माजी खासदार विलास  मुत्तेमवार प्रयत्नशील राहतील. यासाठी त्यांचे दिल्लीत चालायला हवे!दिल्लीत वजन आहे अशा मुकुल वासनिक यांना अभिजित वंजारी यांनी पकडले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान वंजारी दक्षिणेत कमी  रामटेकमध्ये जास्त दिसले. त्यामुळे किमान तिकिटाच्या लढाईत वंजारी यांची ‘जीत’ होईल का? हेही तितकेच महत्त्वाचे. दुरावलेल्या तेली समाजाला  जवळ करण्यासाठी वंजारी यांना दक्षिणमध्ये संधी मिळेल, अशा विश्‍वास त्यांच्या सर्मथकांना आहे. इकडे चार वर्षांंपासून पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासोबत सावलीसारखे राहणारे गिरीश पांडव यांनीही येथे दावेदारी केली आहे. पांडव यांनी  काँग्रेसच्या तिकिटासाठी कवच-कुंडले हाती घेतली आहे. काँग्रेसने हात दिला नाही तर पांडव सेनेत जाऊन दक्षिणेत प्रचाराची डरकाळी फोडू शकतात!  त्यांचे बंधू किरण काटोल येथून गेल्यावेळी शिवसेनेचे उमेदवार होते, हे विशेष. किरण यांना सेनेने शेवटच्या क्षणी मैदानात उतरविले होते. तसे दक्षिणेत झाले तर काँग्रेसच्या मतात येथे बिघाडी होण्याची शक्यता आहे. विशाल  मुत्तेमवार यांना प्रदेश काँग्रेसने नापसंती दर्शविली तर येथे नगरसेवक प्रशांत धवड यांचाही दावा आहे. धवड काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांचे  निकटस्थ आहेत.युतीत ही जागा भाजपच्या वाट्याला आली तर दावेदारांची लांबलचक यादी आहे. नासुप्रचे विश्‍वस्त डॉ. छोटू भोयर, जलप्रदाय समितीचे अध्यक्ष  सुधाकर कोहळे, नगरसेवक रमेश सिंगारे, नगरसेवक सतीश होले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अविनाश ठाकरे असे एकाहून एक दिग्गजांनी  दक्षिणची लढाई लढण्यासाठी दंड थोपटले आहेत. गडकरींना आमच्यामुळेच लीड असा प्रत्येकाचा दावा आहे. महापालिकेच्या पत्रकार कक्षात तसे ते  पटवूनही सांगतात. गेल्यावेळी अशोक धवड यांनीही दक्षिणेत नशीब अजमावले होते. त्यांना मोहन मतेपेक्षा कमी ‘मते’ मिळाली होती. धवड, मते यावेळी लढतील का?  हेही महत्त्वाचे आहे. या मतदारसंघात बसपाची ताकदही आहे. गेल्यावेळी बसपाचे उत्तम शेवडे यांनी १0, ३२६ मते मिळवीत चौथा नंबर पटकाविला  होता. शेवडेंजवळ प्रदेश बसपाची ताकद नाही, नाही तर दक्षिणेत हत्तीही जोर मारू शकतो. येथे मनसेचा काही गल्ल्यात जोर आहे. गेल्यावेळी मनसेचे संजय  पाटील यांनी ३ हजार ३५३ मते मिळविली होते.  यावेळी मनसेतही अनेक दावेदार आहे. मात्र सध्या ते बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या कामात व्यस्त आहेत!  प्रसिद्ध उद्योगपती विशाल बरबटे यांनी दक्षिणसाठी फिल्डींग लावली आहे. त्यांनाही येथे संधी  आहे.