पुणे : राज्यातील खरिपाच्या ११० लाख ३४ हजार ८७० हेक्टरवरील (७८ टक्के) पेरणी आणि लागवडीची कामे उरकली आहेत. त्यातील ७२ लाख हेक्टरवर कापूस आणि सोयाबीनची पेरणी झाली असून, भाताची ४ लाख ९१ हजार ३४८ हेक्टरवर लागवड झाली आहे.पुणे, सातारा, नागपूरसह २४ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक, तर नाशिक, धुळे, जळगाव, कोल्हापूर, जालना, बीड आणि बुलडाणा येथे सरासरीच्या ७५ ते १०० टक्क्यांदरम्यान पाऊस झाला आहे. नंदुरबार, सोलापूर आणि औरंगाबादला ५० ते ७५ टक्क्यांदरम्यान पाऊस पडला आहे. ऊस पीक वगळून खरिपाचे सरासरी क्षेत्र १४०.६९ लाख हेक्टर असून, ११० लाख हेक्टरवरील पेरणी आणि लागवडीची कामे उरकली आहेत. उसाचे सरासरी क्षेत्र ९ लाख ४ हजार ९७८ हेक्टर असून, ७१ हजार ९५६ हेक्टरवर ऊसलागवड झाली आहे. भाताची १७ लाख ८२ हजार हेक्टरपैकी ६ लाख ६ हजार २१६, ज्वारी ७ लाख १९ हजार ३७८ हेक्टरपैकी २ लाख ७९ हजार ९६१ हेक्टरवर, बाजरीची ८ लाख १० हजार ४६७ हेक्टरपैकी ३ लाख ९४ हजार ४८०, बाजरीची ८ लाख १० हजार ४६७ पैकी ३ लाख ९४ हजार ४८० हेक्टरवर पेरणी आणि लागवडीची कामे उरकली आहेत.नाचणीच्या १ लाख ८ हजार ९८६ हेक्टरपैकी २८ हजार ४४१ आणि मक्याची ७ लाख ३६ हजार ६६२ हेक्टरपैकी ६ लाख ६१ हजार ४३४ हेक्टरवरील लागवड आणि पेरणी झाली आहे.
राज्यात ११० लाख हेक्टरवर पेरण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 2:12 AM