लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : राज्य सरकारने शेतकर्यांच्या कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर अद्यापही शेतकर्यांना अजून एक रुपयाही मिळाला नाही, दरम्यान बी-बयाणे आणि रासायनिक खते घेण्यासाठी पैसे नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांसह शेतकर्यांनी शेतात चक्क ह्यदगडाची पेरणी करून सरकारचा निषेध केला. शासनाच्या घोषणेनुसार बँकांकडून दहा हजार मिळत नसल्याने शेतकर्यांना पेरणीची चिंता सतावत आहे. शेतकर्यांच्या या ज्वलंत प्रश्नावर लक्ष वेधत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तालुक्यातील खुटपूरी येथे अभिनव आंदोलन केले. शेतीची संपूर्ण मशागत झाली आहे. मात्र, शेतकर्यांजवळ बी बियाणे घेऊन पेरणी करण्यासाठी पैसे नसल्याने गोपाल काकडे या शेतकर्याच्या शेतात दगड आणि रेतीची पेरणी केली. दरम्यान, शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास लवकरच रुमणे मोर्चे काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी श्रीकृष्ण काकडे, विष्णु जुमळे, मारोती बोचरे, स्वाती काकडे, ममता काकडे, संगीता काकडे, शोभा बाठे, शारदा डवगे, शिला डवगे, पांडुरंग घोडसे, दशरथ घोडसे, सुनील घोरपडे, गजानन गवळी, मोहन अढायके, तुकाराम बोचरे, पांडुरंग काकडे, देवराम घोरपडे, श्रीराम घोरपडे, दीपक अढायके, विक्की बुलबुले, प्रवीण गवळी, प्रशांत बोचरे आदी शेतकरी व महिला उपस्थित होत्या.
खामगावात स्वाभीमानीची दगड पेरणी!
By admin | Published: June 17, 2017 7:31 PM