नाशिक : निवडणुकीत सगळे समान, कोणताही प्रोटोकॉल गरजेचा नाही. नाशिकच्या पवित्र भूमीत येऊन धन्य झालो. नाशिकचे नाव घेताच संस्कृतीचे सात रंग दिसू लागतात. सप्तरंगी रंगात रंगलेले नाशिक हे पवित्र तीर्थक्षेत्र, असे मराठीतून सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिकच्या पिंपळगावमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी भाजपा सरकारच्या विकासकामांचा आढावा घेतला. देशाची सुरक्षा, भ्रष्टाचार, विकास या मुद्यावर मी चर्चा करतो मात्र काहींना विजेचा धक्का आहे त्या ठिकाणी बसतो आणि शिवराळपणा ते करू लागतात. पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाचा टक्का आणि मिळणारे संदेश हादरवून सोडणारे आहेत, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.
भारताकडे वक्रदृष्टी करण्याअगोदर शंभर वेळा शत्रू विचार करतो. डोळ्यात डोळे घालून बोलणार हे मी मागील निवडणुकीत सांगितले होते, त्याचा प्रत्यय या पाच वर्षांत आला असेल. देशाचा जगात जयजयकार केवळ जनतेच्या मतदानामुळे शक्य. भाजपा सत्तेत आल्यानंतर भारताच्या कानाकोपऱ्यात होणारे बॉम्बस्फोट थांबले. आतंकवाद्यांच्या कारखान्यात घुसून तळ उध्वस्त करून भारतीय वायू सेना सुरक्षित पुन्हा परतली, असे मोदी म्हणाले. तसेच भारतातील प्रत्येक गरीब कुटूंबाला 5 लाखांचा उपचार मोफत पुरविण्यासाठी कटिबद्ध, असल्याचेही त्यांनी सांगितले.
दीड लाख गावांमध्ये वेलनेस सेंटर उभारणी केली जात आहे. वेगवान स्थितीत देशात रस्ते आणि गावागावात मोफत वीज पुरवठा सुरू केला. देशातील प्रत्येक गावातील पोस्ट बँकिंग सुधारणा करून गरिबांना सुविधा देत आहोत. नाशिक जिल्ह्यात उडाण योजनेद्वारे वायूमार्ग अधिक सक्षम करत आहोत. नाशिकला लवकरच द्रायपोर्ट सुविधा उपलब्ध करून देणार. आदिवासींच्या शिक्षणासाठी देशभरात एकलव्य शाळा सुरू करत आहोत. वनउपज ला समर्थन मूल्य मिळून देत आहोत. शेतकऱ्यांना बँक खात्यात रक्कम येऊ लागली आहे. सगळ्या शेतकऱ्यांना रक्कम मिळणार हे सुनिश्चित, असल्याचेही मोदी यांनी सांगितले.
कांद्यावरील निर्यात मूल्य कमी करणारसरकार कांद्यावरील निर्यात मूल्य कमी करणार आहे. कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी पारंपरिक प्रथा मजबूत करण्याची गरज आहे. महागाई वाढताच काँग्रेस आपल्या पध्दतीने गोंधळ घालत गृहिणी व शेतकऱ्यांची दिशाभूल करतात अन गैर वापर करून घेतात. मोदींचा लढा शेतकरी आणि व्यापाऱ्यामधील माध्यस्थांविरुद्ध आहे, असे मोदी यांनी सांगितले.
गोदावरीचे पाणी कुठेही नेणार नाही - मोदीतसेच गोदावरीचे पाणी गुजरातला वळविण्याच्या मुद्द्यावर त्यांनी काँग्रेस अफवा पसरवत असल्याचे सांगितले. तसेच इथले पाणी कुठेही जाणार नसल्याचे सार्वजनिकदृष्ट्या जाहीर करत असल्य़ाचे मोदी यांनी सांगितले.