अलिबाग : मतदान करणे हा लोकशाहीतील सर्वाेच्च अधिकार आहे. त्यामुळे मतदानापासून कोणीच वंचित राहू नये, यासाठी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नामी शक्कल लढवली आहे. रुग्णालयातील रुग्णांनाच थेट मतदान करता यावे, यासाठी त्यांनी रुग्णांची विशेष व्यवस्था केली आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या आढाव्याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात बोलवलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निवडणूक कामासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी च्निवडणुकीच्या कामासाठी तब्बल १२ हजार ६९७ अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये सात हजार ४३३ पुरुष आणि पाच हजार २६४ महिलांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे एक हजार ९०५ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. ४१ भरारी पथकांची स्थापनाही केली आहे. ३०१३ मतदान युनिट आणि तेवढेच मतदान यंत्र, ३४५० व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध झाले आहेत.रुग्णांसाठी विशेष सुविधा१रुग्णालयामध्ये उपचार घेणाºया रुग्णांना मतदान करता येत नाही. या पुढे त्यांना मतदान करता यावे, यासाठी रुग्णांना विशेष वाहनाने मतदानकेंद्रावर नेण्यात येणार आहे.२जे रुग्ण मतदानासाठी येण्याच्या स्थितीत आहेत त्यांचाच समावेश आहे, असेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. जिल्हा सरकारी रुग्णालय, सर्व उपजिल्हा रुग्णालय, कुटीर रुग्णालयांतील रुग्णांना मतदान करता यावे, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.३तसेच खासगी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाशीही संपर्क साधण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.वॉके थॉनचे आयोजन१९ आॅक्टोबर रोजी वॉकथॉन आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ‘रायगडकर वोटकर’ हे स्लोगन वापरण्यात येणार आहे. जास्तीत जास्त संख्येने मतदान करणाºया कंपन्यातील कामगार, बचतगट, महाविद्यालयातील विद्यार्थी मतदान करतील त्यांच्या आस्थापनांच्या प्रमुखांचा २६ जानेवारी रोजी सत्कार करण्यात येणार आहे.आवश्यक कागदपत्रेच्मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्र यासह पासपोर्ट, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड, आधार कार्ड, छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळख पत्र (केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्या. कंपनीने दिलेले ओळख पत्र), मनरेगा कार्यपत्रिका (जॉब कार्ड), एनपीआर अतंर्गत आरसीआयद्वारे दिलेले स्मार्ट कार्ड, कामगार मंत्रालयाद्वारे दिलेले आरोग्य विमा स्मार्ट, छायाचित्र असलेले निवृत्ती वेतन कार्ड, खासदार, आमदार विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र हे पुरावे ग्राह्य धरले जातील. मतदान करण्यासाठी येताना प्रत्येक मतदारांने मतदार चिठ्ठी (व्होटर स्लीप) घेऊन येणे आवश्यक आहे. मतदार चिठ्ठी म्हणजे ओळखपत्र समजू नये.