यवतमाळ - जिल्हयातील शेती पिकांवर किटकनाशक फवारणी करणाऱ्या शेतमजुरांसाठी नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन 18 ऑक्टोबर पासून करण्यात आले आहे. कृषी व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.किटकनाशक फवारणी विषबाधा दुर्घटनेनंतर अशा प्रकारची परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजनांचाच एक भाग म्हणून किटकनाशक फवारणी करणाऱ्या शेतमजुरांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्हयातील ग्रामीण रुग्णालयात हे विशेष अभियान राबविण्यात येईल.
किटकनाशक फवारणी करणाऱ्या सर्व शेतमजूरांनी आरोग्य तपासणी संदर्भात जवळच्या ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधून आरोग्य तपासणी करुन घ्यावी. सदर अभियानांतर्गत आरोग्य तपासणी करुन घेणाऱ्या शेतमजूराला आरोग्य तपासणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याचवेळी कृषी विभागामार्फत कीटक नाशकांच्या फवारणीच्या वेळी वापरावयाच्या सुरक्षितता किटचे मोफत वाटप करण्यात येईल.
पुढील फवारणीसाठी शेतमजुरांना काम देताना त्यांच्याकडे आरोग्य विभागाचे फिटनेस प्रमाणपत्र आणि सुरक्षितता किट असल्याची खात्री शेतकरी बांधवांनी करावी. त्यानंतर त्यांना फवारणीचे काम द्यावे, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे. किटकनाशक फवारणीचे काम करणाऱ्या शेतमजूरांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर आणि आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत केले आहे.
संभाजी ब्रिगेड घाटंजी कार्यकर्त्यांना अटकविषबाधेने मरणपावलेल्या शेतक-यांना मुख्यमंत्री कधी भेट देणार यासाठी यवतमाळ जिल्ह्यात 16 तालुक्यात संभाजी ब्रिगेडने "तुम कब आओगे" आंदोलन करत मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला बेश्रमाच्या फुलांचा हार घालुन आक्रोष व्यक्त केला. आतातरी मुख्यमंञी साहेब जागे व्हा व आमच्या आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याला भेट द्या अशी मागणी केली.