शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
3
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
4
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
5
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
7
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
8
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
9
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
10
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
11
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
12
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
13
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
14
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
16
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
17
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

गर्डरसाठी 'मध्य रेल्वे'वर रात्रकालीन सव्वा पाच तासांचा विशेष मेगाब्लॉक, मेल-एक्स्प्रेस गाड्या धावणार उशिराने

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 2:01 PM

ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 2 व 3 दरम्यान पुलाचे गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेवर 5 तास 15 मिनिटांचा विशेष रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात आहे. या ब्लॉकमुळे शनिवारी (26 ऑगस्ट) रात्री 12.50 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 6.05 वाजेपपर्यंत मुलुंड ते कळवादरम्यान धीम्या मार्गावरील अप आणि डाऊनची वाहतूक जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहे.

मुंबई, दि. 25 - ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 2 व 3 दरम्यान पुलाचे गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेवर 5 तास 15 मिनिटांचा विशेष रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात आहे. या ब्लॉकमुळे शनिवारी (26 ऑगस्ट) रात्री 12.50 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 6.05 वाजेपपर्यंत मुलुंड ते कळवादरम्यान धीम्या मार्गावरील अप आणि डाऊनची वाहतूक जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहे. यामुळे सर्व मेल-एक्स्प्रेस गाड्या साधारणतः 10 ते 20 मिनिटे उशीरानं धावण्याची शक्यता आहे. 

शनिवारी रात्री 12.34 ते रविवारी सकाळी 6.10 या वेळेते डाऊन धीम्या मार्गावरील लोकल मुलुंड ते दिवा मार्गावरील लोकल मुलुंड ते दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावरुन चालवण्यात येईल. तर अप धीम्या मार्गावरील लोकल पहाटे 3.48 ते पहाटे 5.53 दरम्यान दिवा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरुन चालवण्यता येईल. त्यामुळे या कालावधीत लोकल गाड्या कळवा आणि मुंब्रा स्थानकावर थांबवणार नाहीत. डाऊन धीम्या मार्गावरील सीएसएटी ठाणे (रात्री 12.34 आणि सकाळी 6.48 वाजताची लोकल ) तर सीएसएमटी डोंबिवली (सकाळी 6.32 आणि 7.16 वाजताची लोकल ) रद्द करण्यात आली आहे. अप मार्गावरील कल्याण-सीएसएमटी (रात्री 9.20 वाजताची लोकल), कल्याण-ठाणे (रात्री 11.39, 11.58 वाजताची लोकल)  तसंच ठाणे सीएसएमटीदरम्या पहाटे 4 ते 6.16 वाजेपर्यंतच्या आठ लोकल फे-या रद्द करण्यात आल्या आहेत. 

डोंबिवली सीएसएमटी (सकाळी 8.14 आणि 8.41) ची लोकलही रद्द करण्यात आली आहे. तर सीएसएमटी-कल्याण (रात्री 10.24), सीएसएमटी-ठाणे (रात्री 11.39), सीएसएमटी-ठाणे (रात्री 11.59) लोकल कुर्ला स्थानकापर्यंतच धावेल. कुर्ला-अंबरनाथ लोकल कुर्ला स्थानकाऐवजी मुंब्रा स्थानकातून चालवण्यात येईल. पहाटे 5.28 वाजता सीएसएमटीहून टिटवाळ्यासाठी सुटणारी लोकल आणि सीएसएमटीहून सकाळी 6.12 ची टिटवाळा लोकल मुंब्रा स्थानकातून टिटवाळा निघेल.   

टॅग्स :central railwayमध्ये रेल्वे