मुंबई : रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त भारतीय टपाल खात्यातर्फे विशेष टपाल तिकीट व विशेष कव्हर प्रकाशित करण्यात येणार आहे.सातारा येथील संस्थेच्या मुख्यालयात ४ आॅक्टोबरला होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात हे प्रकाशन केले जाईल, अशी माहिती टपाल खात्याच्या सूत्रांनी दिली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९ मध्ये लावलेल्या या संस्थारूपी रोपट्याचे आता मोठ्या वृक्षामध्ये रूपांतरझाले आहे. संस्थेच्या या कारकिर्दीबाबत टपाल तिकीट प्रकाशित करून गौरव करण्यात येणार असल्याची माहिती टपाल खात्यातर्फे देण्यात आली.
रयत शिक्षण संस्थेसाठी विशेष टपाल तिकीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 06:23 IST