मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या घोळामुळे हजारो विद्यार्थी आणि त्यांचे पालक सध्या चिंतित आहेत. चौथ्या फेरीअखेर अजूनही ७० हजार विद्यार्थ्यांनी विविध कारणांनी प्रवेश घेतलेला नाही. १ लाख १३ हजार १६१ विद्यार्थ्यांना प्रथम आणि द्वितीय पसंतीक्रम असलेले कनिष्ठ महाविद्यालय अलॉट करण्यात आले आहे. तर १ लाख ५३ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला आहे. परिणामी, या विद्यार्थ्यांसाठी विशेष आॅनलाइन फेरीची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र अकरावीचे कोणतेही प्रवेश आॅफलाइन पद्धतीने होणार नाहीत; याची खबरदारी घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्णत: आॅनलाइन होत आहे. प्रवेशाची जाहिरात २२ जुलै रोजी वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली जाईल. कॉलेज अलॉट करूनही प्रवेश घेतलेला नाही अशा विद्यार्थ्यांना या महाविद्यालयांकडे संपर्क साधण्यासह एसएमएस पाठविणे आणि मूळ लॉगिनचा संदेश २५ जुलैपर्यंत पाठवण्यात येईल. अलॉट झालेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यानंतर महाविद्यालयाला विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे अपलोडिंग २८ जुलैपर्यंत करावे लागणार आहे. पसंतीचे कॉलेज मिळवण्याची संधीज्या विद्यार्थ्यांना दूरचे महाविद्यालय मिळालेले आहे, ज्यांनी विषय चुकीचा निवडलेला आहे, ज्यांना शाखा बदलायची आहे; शिवाय ज्यांचा प्राधान्यक्रम चुकला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही विशेष प्रवेश फेरी असणार आहे. जुलै महिन्यात झालेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी शिवाय एटीकेटीचे विद्यार्थी आणि उर्वरित विद्यार्थ्यांसाठीही याचा फायदा होईल. मात्र, यासाठी ९ ते ११ आॅगस्टदरम्यान नव्याने नोंदणी करून फी भरणे आवश्यक असल्याचे मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)>प्रवेशाची पाचवी फेरीज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले नाहीत किंवा अर्धवट अर्ज भरले आहेत शिवाय अॅलोकशन झालेले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन प्रवेशाची पाचवी फेरी घेण्यात येत आहे.प्रवेश अर्ज सादर करणे : ३० जुलै ते २ आॅगस्टगुणवत्ता यादी प्रसिद्धी:४ आॅगस्टसंबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश : ५ आणि ६ आॅगस्ट>नोंदणी करून फी भरणे : ९ ते ११ आॅगस्टपहिली विशेष फेरी : ९ ते १३ आॅगस्टदुसरी विशेष फेरी : १८ ते २३ आॅगस्टतिसरी विशेष फेरी : २५ ते ३० आॅगस्ट