प्राप्तिकर विभागाकडून पाठविलेल्या नोटिशीचा काय फायदा झाला?मालमत्ताधारक करदात्याला चालू वर्षातील अर्जित मूल्य दाखवून त्यावर कर भरावा लागणार होता़ त्यामुळे शहरातील जवळपास २५ हजार करदात्यांना नोटीस पाठविण्यात आली होती़ त्यानुसार करदात्यांनी योजनेला चांगला प्रतिसाद दिला़ काही करदात्यांनी वेळ मागून घेतला, तर काहींनी प्राप्तिकर कार्यालयात येऊन संपूर्ण माहिती घेतली़ करदात्यांना नोटीस पाठविल्यामुळे खूप लोकांना याबाबतची माहिती झाली़ त्यामुळे करदात्यांनी कर जमा केला़ या योजनेद्वारे करदात्यांची सर्व माहिती गुप्त ठेवून, त्यासाठी एक खिडकी योजना राबवून कमीत कमी वेळेत एकाच ठिकाणी करदात्याला फायदा होईल, याची दक्षता प्राप्तिकर विभागाकडून घेतली गेली़करदात्यांना योजनेची माहिती मिळण्यासाठी काय उपक्रम आहेत?शहरातील करदात्यांसह खेड्यातील नागरिकांना प्राप्तिकराची संपूर्ण माहिती होण्यासाठी कार्यालयातील अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत़ खेड्यातील नागरिकांना रिटर्न भरण्यासाठी जनजागृती केली जात आहे़ ठरावीक करबुडव्यांमुळे नागरिकांपर्यंत वेगळा संदेश जात आहे़ तो थांबविण्यासाठी आणि करदात्यांमध्ये समानता आणण्यासाठी सर्वेक्षण केले जात आहे़ जाणीवपूर्वक अघोषित उत्पन्न लपविणाऱ्या करबुडव्यांना जेवढे दिवस कर बुडवतील तेवढ्या दिवसाचे व्याज आणि कर रक्कम एकत्रित वसूल केली जाणार आहे़शेतकऱ्यांना प्राप्तिकर भरणे आवश्यक आहे काय?शेतकऱ्याला प्राप्तिकर भरण्याची गरज भासू शकते़ आणि हे त्यांच्याच हिताचे आहे़ शेतीसोबत इतर व्यवसाय करणारे अनेक करबुडवे शेतीच्या नावाखाली प्राप्तिकर भरण्यास तयार होत नाही़ शेतीव्यतिरिक्त इतर उत्पन्न असल्यास त्यावर शेतकऱ्यांनी कर भरणे आवश्यक आहे. परंतु शासनाचा शेतीसाठी कायदा नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कर भरलाच पाहिजे अशी सक्ती किंवा अट्टहास केला जात नाही़ मात्र, शेतीच्या नावाखाली बेनामी मालमत्ता लपविणाऱ्या करबुडव्या लोकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून, लवकरच कारवाई करण्यात येणार आहे़ छोटे व्यावसायिक कर भरण्यात टाळाटाळ का करतात? पंतप्रधानांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून केलेल्या आवाहनाला करदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे़ करदात्यांकडून मोठ्या प्रमाणावर कर वसूल होत आहे़ काही छोटे व्यावसायिक प्राप्तिकर विभागाने पाठविलेल्या नोटिशीला वेगळा मार्ग शोधत आहेत. अशा व्यावसायिकांचे सर्वेक्षण झाले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी यादी बनविण्याचे काम सुरू आहे़ डिजिटलायझेशनमुळे प्रक्रिया वेगाने होत आहे़करदात्यांनी वेळेत कर भरण्यासाठी काय आवाहन कराल?पंतप्रधान, अर्थमंत्री, प्राप्तिकर विभाग यांच्या माध्यमातून करदात्यांनी वेळेत करभरणा करावा यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत़ त्या योजनेचा लाभ करदात्यांनी घेतल्यास त्यांना खूप फायदा होणार आहे़ कर प्रक टीकरण योजनेमुळे तीन टप्प्यांत योजना असल्यामुळे व्याज आकारले जात नाही़ करदात्यांनी मालमत्ता जाहीर करून कर भरण्यास प्राधान्य द्यावे़ थकविलेल्या कर रकमेवर भरावा लागणारा व्याजदर खूप असल्याने संबंधितांनी वेळेत कर भरावा़ मुद्दामहून अघोषित मालमत्ता ठेवून कर न भरणाऱ्या करबुडव्यांची प्रकरणे उघडली असता, कर, व्याज आणि दंड एकाच वेळी वसूल केले जाणार आहे़ शब्दांकन : नवनाथ शिंदेकरदात्यांना एकाच वेळी कर जमा करता येत नाही, म्हणून प्राप्तिकर विभागाने तीन टप्प्यांत कर भरता यावा, यासाठी कर प्रकटीकरण योजना जाहीर केली होती़ या योजनेला करदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे़ ही योजना १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीपर्यंत सुरू असून, योजना संपण्यासाठी अवघ्या १० दिवसांचा कालावधी राहिला आहे़ मुदत संपण्याआधी संबंधित करदात्यांनी अघोषित मालमत्तेवरील कर भरला नाही, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे प्राप्तिकर विभागाचे सह आयुक्त अजय डोके यांनी सांगितले.
करबुडव्यांवरील कारवाईसाठी विशेष पथक
By admin | Published: September 21, 2016 2:15 AM