मुंबई : मध्य रेल्वेकडून प्रायोगिक तत्त्वावर पंढरपूर ते मिरज, दादर ते भुसावळ, चाळीसगाव ते धुळे, सोलापूर ते नागपूर, कोल्हापूर ते पुर्णा, तसेच सीएसटी ते चाळीसगाव या मार्गावर पूर्ण आरक्षित तत्काळ विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या महिनाभर या ट्रेन चालविण्यात येणार असून, प्रवाशांचा प्रतिसाद पाहून या गाड्या त्यानंतर चालविण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.पंढरपूर ते मिरज ट्रेनच्या २६ फेऱ्या होणार असून, त्यांचा क्रमांक 0१४२७ आणि 0१४२८ हा आहे. ही गाडी ३ जुलै ते ३१ जुलैपर्यंत शुक्रवार ते रविवारपर्यंत धावेल. या ट्रेनला आराग, सुलगरे, कवठे महांकाळ, धलगाव, जाठ रोड, सांगोला या ठिकाणी थांबा देण्यात येणार आहे. दादर ते भुसावळ ट्रेनच्याही दहा फेऱ्या होणार असून, ट्रेन नंबर 0१0८१ ही ३ ते ३१ जुलैपर्यंत तसेच ट्रेन नंबर 0१0८२ ही ४ जुलै ते १ आॅगस्टपर्यंत धावेल. ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड आणि चाळीसगाव स्थानकांत या ट्रेनला थांबा देण्यात येणार आहे. चाळीसगाव ते धुळे ट्रेनच्याही आठ फेऱ्या होणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. 0११५१ ट्रेन आणि 0११५२ ट्रेन ६ जुलै ते २८ जुलैपर्यंत दर सोमवारी आणि मंगळवारी चाळीसगाव आणि धुळे येथून सुटतील. जामधा आणि शिरुड येथे त्यांना थांबा देण्यात येईल. ट्रेन नंबर 0१४0१ आणि 0१४0२ सोलापूर ते नागपूर ट्रेन ८ जुलै ते ३0 जुलैपर्यंत प्रत्येक बुधवारी आणि गुरुवारी त्या-त्या स्थानकातून सुटतील. कोल्हापूर ते पुर्णा ट्रेनच्याही आठ फेऱ्या होणार असून, ट्रेन नंबर 0१४१९ आणि 0१४२0 ही ८ जुलै ते ३0 जुलैपर्यंत प्रत्येक बुधवारी आणि गुरुवारी धावेल. या गाड्यांचे आरक्षण ३ जुलैपासून सुरू होणार आहे.सीएसटी ते चाळीसगाव ट्रेनच्याही आठ फेऱ्या होतील. ७ जुलै ते २८ जुलैपर्यंत प्रत्येक मंगळवारी या ट्रेन सुटतील. ट्रेन नंबर 0११५४ आणि 0११५३ ट्रेनला दादर, ठाणे, कल्याण, कसारा, इगतपुरी, देवळाली, नाशिक रोड, लासलगाव, मनमाड आणि नांदगाव स्थानकांत थांबा देण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या आरक्षित तत्काळ विशेष ट्रेन
By admin | Published: July 03, 2015 3:37 AM