मुंबई : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी पाहता रेल्वेकडून स्पेशल फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. यात काही फेऱ्यांची घोषणा मध्य रेल्वेने केली असतानाच आता आणखी ११८ फेऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. यात एलटीटी-मडगाव, एलटीटी-करमाळी आणि पनवेल-चिपळूण या ट्रेनचा समावेश आहे. एलटीटी-मडगाव स्पेशल ट्रेनच्या ३६ फेऱ्या होणार असून गुरुवार वगळता ही ट्रेन सहा दिवस धावणार आहे. ट्रेन नंबर 0१00५ एलटीटीहून 00.५५ वाजता सुटून मडगावला त्याच दिवशी १४.४0 वाजता पोहोचेल. तर ट्रेन नंबर 0१00६ मडगावहून १५.२५ वाजता सुटून एलटीटीला ३.५५ वाजता पोहोचेल. ही ट्रेन ८ सप्टेंबर ते २८ सप्टेंबरपर्यंत सोडण्यात येणार आहे. एक एसी टू टायर, दोन एसी थ्री टायर, अकरा स्लीपर क्लास आणि चार सेकंड क्लास डबे ट्रेनला असतील. त्याचप्रमाणे एलटीटी-करमाळी या दररोज धावणाऱ्या ट्रेनच्या ४२ फेऱ्या होणार आहेत. ट्रेन नंबर 0१0२५ एलटीटीहून ५.३0 वाजता सुटेल आणि करमाळी येथे त्याच दिवशी १७.00 वाजता पोहोचेल. ही ट्रेन ८ सप्टेंबर ते २८ सप्टेंबरपर्यंत धावेल. ट्रेन नंबर 0१0२६ करमाळी येथून ५.५0 वाजता सुटून एलटीटी येथे त्याच दिवशी १७.४५ वाजता पोहोचेल. ९ सप्टेंबर ते २९ सप्टेंबरपर्यंत ही ट्रेन धावेल. दहा सेकंड क्लास सीटिंग आणि चार सेकंड क्लास डबे ट्रेनला जोडलेले असतील. पनवेल-चिपळूण डेमू ट्रेनचीही घोषणा करण्यात आली असून त्याच्या ४0 फेऱ्या होणार आहेत. ट्रेन नंबर 0११0७ पनवेलहून ११.१0 वाजता सुटून चिपळूण येथे त्याच दिवशी १६.00 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0११0८ चिपळूणहून १७.३0 वाजता सुटून पनवेल येथे २२.३0 वाजता पोहोचेल. ही ट्रेन सप्टेंबरच्या ४, ५, ६, ८, ९, ११, १२, १३, १५, १६, १७, १९, २0, २१, २३, २४, २६, २७, २९, ३0 तारखेला सोडण्यात येणार आहे. ही ट्रेन अनारक्षित असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.एलटीटी-मडगाव ट्रेनचे थांबे ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मदुरे, थिविम आणि करमाळी. एलटीटी-करमाळी ट्रेनचे थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मदुरे, पेरनेम, थिविम.पनवेल-चिपळूण ट्रेनचे थांबे : रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवा खवटी, खेड, अजनी, ट्रेन नंबर 0१00५, 0१0२५ यांचे आरक्षण १४ आॅगस्टपासून सुरू होईल. ही स्पेशल ट्रेन असल्याने तिकिटांसाठी स्पेशल दर आकारले जातील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या
By admin | Published: August 12, 2015 3:43 AM