मुंबई, दि. 30 - मुसळधार पावसामुळे मुंबईकरांच्या लाईफ लाइनला ब्रेक लागला. बुधवारी बहुतांशी ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली. मात्र रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रशासनाने सर्व लोकल फेऱ्या या 'विशेष' फेऱ्या म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला. परिणामी विविध स्थानकावर 0.00 या वेळेचे इंडिकेटर दिसत होते. सायंकाळच्या सत्रात मध्य हार्बर मार्गावर बऱ्यापैकी लोकल फेऱ्या सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे 'इंडिकेटर नको पण गाडी येऊ दे' अशी प्रतिक्रिया प्रवाशांमध्ये उमटत होती
हार्बर रेल्वे डाऊन मार्गावरील सीएटी ते पनवेल , पनवेल ते कुर्ला रेल्वे सुरू आहे. कुर्ला ते सीएसटी अद्यापही बंद असून लवकरच ही सेवा देखील सुरू करण्यात येईल.सीएसटी येथून डाऊन दिशेने रेल्वे सोडण्यात येत आहे. पण सध्या च्या परिस्थितीमुळे लोकल काही लोकल उशिराने धावणार आहेत.
मध्य रेल्वे सायंकाळच्या सत्रात अप डाऊन धीम्या आणि डाऊन जलद मार्गावरील सेवा सुर झाली आहे. टिटवाळा येथून सीएसटीकडे जाणारी वाहतूक विलंबाने धावत आहे. कल्याण-कुर्ला, ठाणे कुर्ला , डोंबिवली कुर्ला अशी वाहतूक देखील विलंबाने धावत आहे टिटवाळा ते कसारा मार्गावर पावसाच्या अडचणी मुळे काम करण्यास अडचण निर्माण होत आहे. मरेच्या युद्धपातलीवर पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहे.
पश्चिम रेल्वेपश्चिम रेल्वे प्रशासनाला उपनगरीय रेल्वे सेवांबदल विचरले असता मुख्य जनसंपर्क अधिकारी आर. भाकर म्हणाले की आम्ही जे ट्विट करू ते पहा. रेल्वेचे सगळेच प्रवासी ट्विटर स्वही नसल्यामुळे प्रवाशांमध्ये याबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. दरम्यान सायंकाळच्या सत्रात परेच्याअप आणि डाऊन लोकल सुरू असल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. अपघात टाळण्यासाठी स्पीड लिमीटसह लोकल धावत आहे. वेळापत्रक कोलमडल्याने परेवर ही गंतव्य स्थानकावर पोहचण्यासाठी लोकल फेऱ्याला उशिर होत आहे.