नवी मुंबई - उन्हाळ्याच्या हंगामासाठी कोकण रेल्वेने विविध मार्गांवर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ७ एप्रिल ते ६ जून दरम्यान विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत.
मुलांच्या परीक्षा संपत आल्या आहेत. अनेकांनी फिरायला, गावी जाण्यासाठी काेकण रेल्वे मार्गांवर गाड्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात उधना जंक्शन-मंगळुरू जंक्शन ही विशेष द्वी साप्ताहिक गाडी चालविली जाणार आहे. ही गाडी ७ एप्रिल ते ५ जून या कालावधीत प्रत्येक बुधवार आणि रविवारी उधना जंक्शन येथून रात्री ८ वाजता सुटेल, तर दुसऱ्या दिवशी सांय. ७ वाजता मंगळुरू जंक्शनला पोहचेल. त्याचप्रमाणे मंगळुरू जंक्शन -उधना जंक्शन ही गाडी ८ एप्रिल ते ६ जून यादरम्यान गुरुवारी आणि सोमवारी चालविली जाणार आहे.