शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
5
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
6
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
7
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
8
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
9
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
10
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
11
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
12
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
14
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
15
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
16
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
17
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
18
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
19
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
20
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

स्पेक्ट्रमचा लिलाव होणार आता शुभ मुहूर्त पाहून!

By admin | Published: August 24, 2016 4:40 AM

कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी चांगला मुहूर्त पाहण्याची आपल्याकडे प्रथा आहे.

मुंबई : कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी चांगला मुहूर्त पाहण्याची आपल्याकडे प्रथा आहे. दूरसंचार स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यासाठीही सरकार आता शुभ मुहूर्त शोधत आहे. दूरसंचार सचिव जे. एस. दीपक यांनीच ही माहिती दिली. दूरसंचार सचिवांनी सांगितले की, २0 सप्टेंबर रोजी स्पेक्ट्रम लिलाव होणार होता. तथापि, अनेक कंपन्या आणि लोकांचे असे म्हणणे आहे की, १ आॅक्टोबरपासून नवरात्र सुरू होत आहे. हा काळ बोली लावण्यासाठी शुभ आहे. लिलावात भाग घेणाऱ्या लोकांना चांगले वाटत असेल आणि स्पेक्ट्रम खरेदीत ते अधिक पैसा देणार असतील, तर सरकार स्पेक्ट्रम लिलावाची तारीख बदलून आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करू शकते. या लिलावातून आवश्यक तेवढा महसूल सरकारला नक्की मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येणारा स्पेक्ट्रम लिलाव हा आजपर्यंतचा सर्वांत मोठा लिलाव असल्याचे मानले जात आहे. स्पेक्ट्रमचे आधार मूल्य जास्त ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कंपन्यांत त्याबाबत फारसा उत्साह दिसून येत नाही. देशातील तिसरी मोठी दूरसंचार कंपनी आयडियाच्या मुख्य वित्त अधिकाऱ्याने याच महिन्यात सांगितले होते की, दूरसंचार उद्योग आता स्पेक्ट्रमच्या टंचाईकडून अतिरिक्त स्पेक्ट्रमकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे येणाऱ्या लिलावात कंपन्या आवेशात बोली लावणार नाहीत. आर्थिक आधारावरच निर्णय घेतील. असे असले, तरी दीपक यांनी स्पेक्ट्रम लिलावाला चांगला प्रतिसाद मिळेल, असा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही मोठ्या संख्येत चांगल्या गुणवत्तेचे स्पेक्ट्रम विक्री करीत आहोत. (लोकमत न्यूज नेटवर्क)