शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
3
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
4
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
6
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
7
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
8
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
9
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
10
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

लाल किल्ल्यावरून भाषण केल्याने कोणी पंतप्रधान होत नाही!

By admin | Published: September 19, 2016 5:12 AM

लाल किल्ल्यावरुन भाषण केल्याने कोणी पंतप्रधान होत नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला

कल्याण : पंधरा वर्षापूर्वी मी लाल किल्ल्यावर गेलो होतो. तेव्हा लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा मोह मलाही आवरला नाही. अर्थात लाल किल्ल्यावरुन भाषण केल्याने कोणी पंतप्रधान होत नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आणि प्रत्येक गोष्टीचा आधार आपल्याला मिळावा या हट्टापायी पुलांचे परस्पर उद््घाटन करण्याच्या वृत्तीबद्दल चिमटे काढले. डोंबिवलीतील मोठागाव ठाकुर्ली ते माणकोली आणि कोन ते दुर्गाडी या दोेन खाडी पुलांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी सकाळी कोन येथे करण्यात आले. यावेळी खासदार कपील पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार किसन कथोरे, नरेंद्र पवार, गणपत गायकवाड, शांताराम मोरे, एमएमआरडीएचे आयुक्त यू. पी. एस. मदान आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपाचे खासदार कपिल पाटील या पुलाच्या कामाचे श्रेय लाटत असल्याचा आरोप करीत शिवसेनेने शनिवारी डोंबिवलीत या पुलांच्या उद््घाटनाचा कार्यक्रम पार पाडत खुद्द मुख्यमंत्र्यांनाच शह दिला होता. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असलेले शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पुलाचे श्रेय मिळावे म्हणून शिवसेनेने हा कार्यक्रम पार पाडला होता. त्यातून शिवसेना-भाजापातील संघर्ष समोर आला होता. त्याचा समाचार मुख्यमंत्री घेणार हे अपेक्षित होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात शिवसेनेला भरपूर चिमटे काढले. (प्रतिनिधी)>शिवसेनेचा नामोल्लेख टाळत त्यांच्या कार्यकर्त्याना जे वाटले, ते त्यांनी केले. ही कृती उत्साहाच्या भरातील होती, पण नरेंद्र मोदी यांच्याकडून आम्ही विकासाचे राजकारण शिकलो असल्याने असल्या गोष्टींकडे आम्ही दुर्लक्ष करतो, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. पूल पूर्ण झाल्यावर त्याच्या उद््घाटनाचा कार्यक्रम डोंबिवलीत घ्या, असे रवींद्र चव्हाण यांनी सुचवले. तेव्हा पुलाचे उद्घाटन डोंबिवलीत करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. पण त्यावेळी पुन्हा पुलाचे दुसरे उद््घाटन कोन येथे करु नका, असा चिमटा मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढला.