शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
2
"अशा घोषणा लोकांना आवडणार नाहीत"; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध
3
"काही मशिनमध्ये गडबड होण्याची शक्यता! असं परदेशी माणूस म्हणतोय"; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
4
महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
5
'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका
6
“कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?”; शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार
7
"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
8
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
9
“महायुतीविरोधात तीव्र संताप, १७५ जागांसह मविआचे सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा
10
"विराटचं काहीतरी बिनसलंय, संघात असूनही तो रोहित अन् गंभीरशी..."; माजी क्रिकेटपटूचा दावा
11
Exclusive: "आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव
12
परीक्षार्थींच्या आंदोलनासमोर युपीपीएससी नमली; एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार
13
पुन्हा बॅगा तपासल्या! तिसऱ्यांदा तपासणीवर उद्धव ठाकरेंचा रोखठोक प्रश्न; अधिकारी म्हणाले...
14
‘बांगलादेशात ९० टक्के मुस्लिम, सेक्युलर शब्दाची आवश्यकता नाही’, मोहम्मद युनूस सरकार मोठा निर्णय घेणार? 
15
'RBI ने व्याजदर कमी करावेत' गोयल यांच्या मागणीवर गव्हर्नर दास यांचं एका वाक्यात उत्तर
16
कर्नाटकात भाजप ‘ऑपरेशन लोटस’ चालवत आहे; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनंतर शिवकुमारांचा दावा
17
जरी मला मुख्यमंत्री केले तरी मी होणार नाही; 'महाराष्ट्राचा सीएम कोण'वर असे का बोलले नितीन गडकरी?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'१५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार'; भाजपा महिला नेत्याचं वादग्रस्त विधान
19
Ranji Trophy : एका डावात दोघांची ट्रिपल सेंच्युरी; डाव घोषित केल्यामुळं हुकली वर्ल्ड रेकॉर्डची संधी
20
महाराष्ट्राच्या रणांगणात ४० लाख उत्तर भारतीय मतदार; मुंबईत २२ जागांवर निर्णायक मते

चिपळूण-कराड रेल्वेमार्गाला गती

By admin | Published: October 28, 2015 2:14 AM

राज्यातील बंदरांच्या विकासात मोठा हातभार लावणाऱ्या चिपळूण-कराड या नवीन मार्गाला गती देण्यासाठी कोकण रेल्वे व राज्य सरकारची संयुक्त विशेष कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

मुंबई : राज्यातील बंदरांच्या विकासात मोठा हातभार लावणाऱ्या चिपळूण-कराड या नवीन मार्गाला गती देण्यासाठी कोकण रेल्वे व राज्य सरकारची संयुक्त विशेष कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत ही कंपनी स्थापन केली जाणार असल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली. या प्रकल्पामुळे बंदरांचा विकासाला चालना मिळण्याबरोबरच कोकण रेल्वेच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे. १0३ किलोमीटर लांबीचा आणि ९0 गावांमधून जाणारा चिपळूण-कराड रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी कोकण रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत. हा नवीन मार्ग कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडताना राज्यातील रेवस, दिघी, जयगड, आंग्रे, विजयदुर्ग, रेडी बंदरांचा विकासही त्यामुळे मोठ्या प्रमाणात होईल. कोकण रेल्वेकडून प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यात आला असून, सुमारे २,५00 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सार्वजनिक-खासगी सहभाग तत्त्वावर प्रकल्प साकारण्यात येईल, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली. यामध्ये राज्य सरकारचा ५0 टक्के सहभागाची तयारी दर्शविली असून, कोकण रेल्वेचा वाटा हा २६ टक्के एवढा राहील. उर्वरित सहभाग हा खासगी आहे. या प्रकल्पामुळे कोळशाची २0१८ मध्ये होणारी वाहतूक प्रतिवर्षी ११ मेट्रिक टन इतकी होईल आणि मालवाहतुकीबरोबरच रासायनिक खते आणि कच्चे लोखंड यांची वाहतूकही करण्यात सोप्पे जाईल. २0१९ मध्ये एकूण मालवाहतूक प्रतिवर्षी १४.९ मेट्रिक टनवरून २0३३ मध्ये प्रतिवर्षी ४३.२ मेट्रिक टन इतकी वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. चिपळूण-कराड नवीन मार्ग उपलब्ध झाल्यास, पाच हजारांहून अधिक प्रमाणात थेट रोजगार उपलब्ध होतील, तर हळूहळू रोजगाराचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे प्रकल्पाचा फायदा स्थानिकांना मिळेल.