शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
2
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
3
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा
4
जबरदस्त! अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार; BSNL'चा 'हा' स्वस्त रिचार्ज प्लॅन ५२ चालणार
5
अक्षय शिंदे एन्काउंटर : ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा
6
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
7
Northern Arc Capital IPO Listing: दमदार लिस्टिंगनं पैशांचा पाऊस, प्रत्येक शेअरवर किती झाला गुंतवणूकदारांना फायदा?
8
Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया
9
तिरुपती मंदिरात ४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले? पाहा, महत्त्व
10
'बिग बॉस' मराठीचा महाअंतिम सोहळा आणि हिंदीचा ग्रँड प्रीमियर एकाच दिवशी, जाणून घ्या तारीख
11
जीवघेणं 'टायमिंग'! पतीशी भेट शेवटची ठरली; 'त्या' गोड बातमीचा आनंद अपघाताने हिरावला
12
"ओवेसींच्या पायजम्याची साइज टिंगूपेक्षा मोठी’’, इम्तियाज जलील यांची नितेश राणेंवर टीका  
13
मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती
14
IND vs BAN 2nd Test; India's Probable Playing XI : लोकेश राहुलसह बुमराह 'आउट'; या दोघांना मिळू शकते संधी
15
१११ वर्षांनी पितृपक्षात शुभ योग: ६ राशींना सर्वोत्तम, लाभच लाभ; नशिबाची साथ, भाग्याचा काळ!
16
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
17
पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत
18
MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश: कृषी सेवेतील पदांचा समावेश करत पूर्व परीक्षेची नवी तारीख आयोगाकडून जाहीर
19
MobiKwik IPO: ₹७००००००००० उभारण्याची तयारी; मोबिक्विकच्या आयपीओला सेबीचा हिरवा झेंडा
20
थरकाप उडवणारं हत्याकांड! कोण होती महालक्ष्मी?, जिचं मुंडकं फ्रीजमध्ये सापडलं

शौचालय बांधकामांतून हगणदारीमुक्तीला वेग

By admin | Published: September 29, 2015 1:59 AM

राज्याला हगणदारीमुक्ती हा शब्द देणाऱ्या नगर जिल्ह्यात हागणदारीमुक्तीचा वेग वाढत आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या संकेतस्थळावर दररोज

ज्ञानेश दुधाडे, अहमदनगरराज्याला हगणदारीमुक्ती हा शब्द देणाऱ्या नगर जिल्ह्यात हागणदारीमुक्तीचा वेग वाढत आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या संकेतस्थळावर दररोज भरण्यात येणाऱ्या आॅनलाइन माहितीतून ही बाब समोर आली आहे. शौचालय बांधकामात राज्यात पुणे जिल्हा एक नंबर असून त्या खालोखाल सातारा आणि कोल्हापूर असून चौथ्या स्थानावर नगर आहे.जिल्ह्यात हागणदारीमुक्ती प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय पेयजल आणि स्वच्छता विभागाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी शौचालय बांधण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. बेसलाइन सर्वेक्षणातून शिल्लक राहिलेल्या कुटुंबांची नावे या बेसलाइनमध्ये टाकण्यासाठी जिल्ह्णात मोहीम राबवण्यात आली. यासाठी ८ सप्टेंबर ही अखेरची मुदत देण्यात आली होती. यासाठी गावा-गावात दवंडी देण्यात येवून प्रत्येक कुटुंबाला शौचालय नसणाऱ्याच्या बेसलाईन सर्वेक्षणात नाव टाकण्याचे आवाहन करण्यात आले होते. यासह ज्या ठिकाणी शक्य आहे, अशा ठिकाणी शौचालय बांधून घेण्यात येत आहे. बांधण्यात आलेल्या या शौचालयाची माहिती केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येत आहे. यात टक्केवारीत तांत्रिक दृष्ट्या नगर जिल्हा १५ व्या क्रमांकावर दिसत आहे. नगर राज्यात चौथ्या स्थानावर आहे.