सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील थकबाकीच्या कारणामुळे सांगोला कारखान्याच्या संचालकांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात येत असून, संत दामाजी, स्वामी समर्थ, सांगोला सहकारी, संतनाथ वैराग या कारखान्यांकडील थकबाकीसाठी राज्य बँकेचे पथक सोलापुरात येत आहेत.सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक सध्या आर्थिक अडचणीत आहे. बँकेच्या संचालक मंडळाकडे व त्यांच्या नातेवाईकांकडेच मोठी रक्कम अडकली आहे. जिल्ह्याच्या नेत्यांनीच घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नसल्याने, सर्वसामान्य अनेक शेतकरीही कर्ज भरण्यास तयार नाहीत. यामुळे बँकेची थकबाकी वाढत गेली असून, कर्जवाटप ठप्प झाले आहे. मंगळवेढ्याचा संत दामाजी, अक्कलकोटचा स्वामी समर्थ, सांगोला सहकारी व वैरागचा संतनाथ या कारखान्यांनी थकबाकी भरली नाही. याकारखान्यांकडील वसुलीसाठी राज्य बँक महत्त्वाची आहे. राज्य बँकेचे अध्यक्ष सुखदेवे व कार्यकारी संचालक प्रमोद कर्नाड हे येत्या सोमवारी सोलापुरात कारखान्यांच्या व्यवस्थापनाची बैठक घेणार आहेत. सांगोला साखर कारखान्याकडील कर्जाच्या वसुलीसाठी जिल्हा बँकेने सहकारन्यायालयात दावा दाखल केला होता. (प्रतिनिधी)
थकबाकी वसुलीला गती
By admin | Published: June 03, 2016 3:24 AM