पुणे : महापालिकेची निवडणूक काही दिवसांवर आली असताना अचानक ५०० व १०० रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी त्यांची संपूर्ण यंत्रणा कामाला लावण्यास सुरूवात केली आहे. निवडणुकीसाठी करावायचा प्रस्तावित खर्चापैकी बहुतांश खर्च डिसेंबरपूर्वी उरकून काळा पैसा मार्गी लावण्याचे नियोजन काही उमेदवारांकडून केले जात आहे. महापालिका निवडणुका यंदा पहिल्यांदाच ४ सदस्यीय पध्दतीने होणार आहे, त्यामुळे यापुर्वीच्या निवडणुकांच्या तुलनेत उमेदवारांना जास्तीचा खर्च करावा लागणार आहे. अनेक इच्छूक उमेदवारांनी कोटयावधी रूपयांची रोख रक्कम निवडणुकीसाठी जमा करून ठेवली होती. नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी घेतलेल्या ५०० व १०० रूपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाने त्यांना मोठा धक्का बसला.
डिसेंबर पूर्वीच उडणार निवडणूक खर्चाचा धुराळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2016 2:08 AM